समुद्रमंथन : कांगावा असभ्यवर्तनाचा कि चोरी पकडल्याचा

 समुद्रमंथन : कांगावा असभ्यवर्तनाचा कि चोरी पकडल्याचा

Samudramanthan: Kangava for misbehaving or caught stealing

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Mon27 Feb23 ,16.10 Pm By राजेंद्र सालकर

कोपरगाव : तहसीलदार यांची नाचक्की मोहीम सुरू झाल्याने तो ग्रामीण रुग्णालय व्यवस्थापनाला  अडचणीचा ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ग्रामीण रुग्णालयाला भल्या पहाटे अचानक भेट देऊन तहसीलदार यांनी येथील कर्मचारी संख्या व डॉक्टर यांच्या उपस्थितीबद्दल प्रश्न उपस्थित केला. डॉक्टरसह एकूण ५२  कर्मचारी व संख्या असलेल्या रुग्णालयात रात्रपाळीला केवळ दोनच जण  उपस्थित असल्याने व्यवस्थापनाचे दुर्लक्ष झाले आहे. ही परिस्थिती लक्षात आली. उपस्थित भरती झालेल्या रुग्णांना व रात्री येणाऱ्या रुग्णांसाठी  अन्य सुविधा उपलब्ध करण्याचा इरादा तहसीलदार विजय बोरुडे यांचा प्रयत्न तर नव्हता ना ?  तो तसं त्यांनी व्यक्त केला  व भेट दिल्याचे सांगितले  तथापि त्यांनी ग्रामीण रुग्णालय व्यवस्थापन, डॉक्टर परिचारिका कर्मचारी रुग्ण  अशा कोणालाही विश्वासात न घेता पहाटे साडेपाच वाजता  पाहणी केली. हा मुद्दा रुग्णालय प्रशासनाच्या  नजरेत भरला. त्याचवरून सध्या वाद तापला आहे.
ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना  सुविधांची गरज
 ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी शहरासह तालुक्यातील लोक रात्रंदिवस येत असतात . त्यांच्या सुविधांसाठी अनेकदा आराखडेही तयार केले आहेत. त्याची पूर्तता होण्याकडे आजवरच्या सर्वानीच  दुर्लक्ष केले आहे. रुग्णांची वाढती गर्दी मिळणारे उपचार औषधांचा तुटवडा  हे मुद्दे कायम चर्चेत असतात. या दोन्हीची गरज लक्षात घेऊन    याच हेतूने त्यांनी येथे तहसीलदार यांनी भेटही दिली होती का ?. यावेळी उपस्थित असलेल्या परिचारिका यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना कॅमेऱ्यासमोर बोलताना तहसीलदार यांनी रुग्णालयात उपस्थित असलेल्या स्टाफ बाबत खंत व्यक्त  केल्याचे सांगतात  तसेच रुग्णाच्या नातेवाईक महिलेची भेट घेऊन चौकशी करताना त्यांना मिळणाऱ्या असुविधा बाबतही खंत व्यक्त केली असे स्पष्ट वक्तव्य केले आहे पुढे जाऊन त्या म्हणतात की तहसीलदार यांनी आमचे वैद्यकीय अधिकारी यांच्या विरोधात असभ्य  भाषा वापरली माझ्या व रुग्णाच्या महिला नातेवाईकाच्या पाठीवरून हात फिरवल्याचेही ते सांगतात  याचा अर्थ कोणीही उपस्थित नसल्याचे पाहून त्यांचा संयम  सुटला का ? व त्यांच्याकडून काहीसे असभ्यवर्तन घडले असे गृहीत धरले तर दुसरीकडे  परिचारिकेने  स्टाफ व रुग्णांच्या नातेवाईकाबद्दल  त्यांनी व्यक्त केलेली खंत विचारात घेता भावनेने व्यतीत झाल्यामुळे  त्यांनी पाठीवरून  हात फिरवला असे होऊ शकते का? शक्यता काहीही असली तरी प्रत्यक्षात पोलीस स्टेशनला गेलेला अर्ज व दाखल झालेला गुन्हा पाहता  तहसीलदार बोरूडे यांच्या  विरोधात काहूर उठले आहे. वादात ग्रामीण रुग्णालय रुग्णालयातील गैरहजर कर्मचाऱ्यांचा  व रुग्णांच्या  सुविधांचा मुद्दा मात्र दुर्लक्षित झाला आहे.
तहसीलदार  बोरूडे यांची भूमिका वरकारणी भावणारी असली तरी त्यात सर्वसमावेशकतेचा मोठाच अभाव जाणवत आहे. ही संकल्पना विश्वासात घेऊन करणे अपेक्षित असताना ती ज्या गुपचूपररीत्या अचानक भेट देऊन केल्याने  त्यावरून शंका- कुशंका व्यक्त केल्या जात आहेत.दरम्यान तहसीलदार यांनी आपल्या गाडीवरील चालकामार्फत   मोबाईलवर चित्रित केलेल्या  दोन चित्रफिती  प्रसार माध्यमावर टाकलेल्या आहेत  त्यात वेगळेच दिसते आहे. स्वतःचा चालक मोबाईलवर चित्रीकरण करत असताना तहसीलदार सारखा जबाबदार माणूस  तेथे असलेल्या महिलांशी असभ्यवर्तन करील असे वाटत नाही.
तिकडे एकमेव उपस्थित परिचारिकेच्या म्हणण्यानुसार त्यांनी केलेल्या असभ्यवर्तनाची व  डॉक्टर  यादव  यांच्याबद्दल  फोनवर केलेल्या  कथित विधानाची सांगड  भेट प्रकरणाशी जोडली जात आहे. परिणामी तहसीलदारांचा  अचानक भेट व छुपी पाहणी, करण्यामागील उदात्त हेतू हा विरून जावून तहसीलदार हेच आता वादाच्या कचाट्यात सापडले आहे.
तहसीलदारांची भूमिका ही  रुग्णांना सुविधा मिळावी अशी ही असू शकेल. परंतु त्यांच्या या भूमिकेमुळे ग्रामीण रुग्णालयातील  पितळ उघडे पडले आहे. याच भीतीने असभ्यवर्तनाला हवा देऊन उधळून लावण्याचा तर हा प्रयत्न नाही ना ?
त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी करणारा अर्ज शहर पोलीस स्टेशनमध्ये देण्यात आला असून रान उठवण्यास सुरुवात केली आहे. याप्रकरणी रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे  तहसीलदार विजय बोरुडे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे तरी प्रकरण एवढ्यावरच थांबेल असे वाटत नाही कारण महसूल खात्याच्या मोठ्या अधिकाऱ्यावर महसूल मंत्र्यांच्या जिल्ह्यात असा संवेदनशील गुन्हा दाखल झाला असल्यामुळे याची पाळीमुळे नक्कीच खोदली जाणार आहेत तूर्तास महसूल, आरोग्य आणि पोलीस या तीन सरकारी खात्याशी संबंधित असल्याने या समुद्रमंथनातून नेमके बाहेर काय येते याकडे कोपरगावकरांंचे लक्ष लागले आहे. 

Leave a Reply

You cannot copy content of this page