खंदकनाल्याच्या अर्धवट कामामुळे अपघातास निमत्रंण – मंगेश पाटील
Mangesh Patil invites accident due to incomplete work of canal
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Tue 28 Feb23 ,20.50 Pm By राजेंद्र सालकर
कोपरगाव : कोपरगाव शहरातील खंदकनाल्याच्या अर्धवट कामामुळे संजय नगर सुभाष नगर यासह परिसरात प्रचंड दुर्गंधी व डासांचे विळख्यात सापडला असून या परिसरात मोठ्या प्रमाणात साथीच्या रोगाबरोबर अर्धवट कामामुळे अपघाताला ही निमंत्रण मिळाले आहे असे माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे
अतिक्रमणाच्या विळख्यात सापडल्यामुळे मागच्या वर्षी झालेल्या धुवाधार पावसामुळे नाला तुंबल्याने घरात पाणी शिरल्याने परिसरातील लोकांवर मोठा प्रसंग बाका प्रसंग उद्भवला होता. त्यावेळी नगरपालिकेने तातडीने नाला खोदाई युद्ध पातळीवर सुरू केल्याने परिसरातील नागरिकात समाधानाचे वातावरण निर्माण झाले; मात्र कालांतराने नगरपालिका प्रशासनाने संबंधित कामे अर्धवट स्थितीत सोडून दिले. उपसलेली माती व सिमेंटचे चार चार फुटी भले मोठेमोठाले पंचवीस ते तीस पाईप जाग्यावर टाकल्याने परिसरातील मुख्य रस्त्यांची वाताहात झाली, नाल्यातील दोन पाईप काढले गेलेच नाही.या मार्गावर भाजीपाला मार्केट असल्याने भल्या पहाटे अंधारातच लिलावासाठी शेतकरी व्यापारी यांची मोठी गर्दी होते माल नेआण करण्यासाठी या ठिकाणी रिक्षा, टेम्पो, दुचाकी, हातगाड्या ही वाहनेही मोठ्या प्रमाणात येतात. जोडीला पडलेला भाजीपाला खाण्यासाठी गायी,गाढव, डुकरे, मोकाट जनावरांची गर्दी होते. वाहनांची वर्दळ व शेतकऱ्यांची लगबग असल्यामुळे अरुंद झालेल्या या रस्त्यावर या ठिकाणी दोन वाहने जाऊ येऊ शकत नाही त्यामुळे घाईघाईत ये जा करताना नाल्यात रिक्षा , टेम्पो , मोटरसायकल वर भाजीपाला आणणारे पलटी होऊन अपघाताचा आमंत्रण मिळत आहे,
दरम्यानच्या रस्त्यावरती असलेला गाळ कचरा व सिमेंटच्या नळ्या बाजूला करून , अशा धोकादायक अपघातजन्य जागी आता अपघात होण्याची वाट न पाहता पालिकेने
तातडीने वाहतुकीस पूर्ववत करावा, आता अपघात होण्याची वाट न पाहता पालिकेने अशी जनतेची हि मागणी आहे
Post Views:
152