केंद्रीय निवडणूक आयोग भाजपचे बाहुले आहे- विनोद घोसाळकर
The Central Election Commission is BJP’s puppet – Vinod Ghosalkar
ठाकरे गटाचे कोपरगावात शिवगर्जना अभियानShivgarjana campaign of Thackeray group in Kopargaon
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Tue 1 March23 ,19.00 Pm By राजेंद्र सालकर
कोपरगाव :शिवसेना पक्ष आणि चिन्हासाठी न्यायालयीन लढाई सुरू आहे. लोकशाहीत निर्णयाची अपेक्षा होती. पण निर्णय पक्ष आणि चिन्ह शिंदे गटाला दिल्याचा आला.हे सर्व हुकूमशाहीच्या मार्गाने चाललेलं आहे. केंद्रीय निवडणूक आयोग भाजपचे बाहुले आहे अशी टीका ठाकरे गटाचे उपनेते (म्हाडा अध्यक्ष) विनोद घोसाळकर यांनी कोपरगाव येथे बुधवारी (१मार्च) रोजी कलश मंगल कार्यालयातील शिवगर्जना अभियानात केली. अभियानाच्या अध्यक्षस्थानी नगर जिल्हा संपर्क नेते बबनराव घोलप होते.
घोसाळकर पुढे म्हणाले,महाशक्तीची ठोकशाही मान्य नाही, उध्दव ठाकरे दिल्लीच्या तख्ताला घाबरले नाहीत.जिंकेपर्यंत लढायचे त्यांना,यांना व येणाऱ्यांना घ्या,शिर्डी लोकसभा मतदारसंघातून चार वेळा खासदार दिले. काही राहिले, काही गेले मात्र मतदार आमच्याबरोबर आहे.
उपनेते बबनराव घोलप म्हणाले, या काळात राज्यातील तळागाळातील शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या बाजूने आहे. या शिवसैनिकांशी संवाद साधण्यासाठी या मतदारसंघात शिवगर्जना अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे.गावागावात झंझावात पोहचवायचा प्रस्थापितांना जिल्हा आहे. तेव्हा जागरूक राहून संकटाला तोंड द्या असे आवाहन त्यांनी केले.
जिल्हाप्रमुख प्रमोद लबडे म्हणाले,घोलप यांच्या रूपाने शिवसैनिकांच्या पाठीवरून हात फिरवणारा नेता मिळाला असल्याचे गौरवउद्गार व्यक्त केले.
महिला आघाडी जिल्हाप्रमुख सपना मोरे म्हणाले, बाळासाहेब ठाकरे हाच आमचा पक्ष आणि चिन्ह आहे. पक्ष आणि चिन्ह चोरले म्हणून खचून जाऊ नका फिनिक्स पक्षाप्रमाणे पुन्हा भरारी घेऊ असे सांगताना त्यांनी कवि हरिवंशराय बच्चन यांच्या अग्निपथ कवितेचे काही ओळींचे वाचन केले.
युवा सेनेचे साईनाथ दुर्वे म्हणाले, सध्या लोकशाही पायाखाली तुडवली जात आहे त्यामुळे जनतेच्या आणि शिवसैनिकांच्या मनात आक्रोश आहे संपलो नाही लढू आणि जिंकू असा आत्मविश्वास व्यक्त केला.
उल्हास पाटील म्हणाले, शिवगर्जनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेला येणाऱ्या पुढच्या अराजकापासून सावध करण्यासाठी भविष्यातील वाटचालीचे नियोजन करण्यासाठी आलो असल्याचे सांगितले.
उपनेते विजय कदम म्हणाले आज उद्धव ठाकरे यांचे विचार व आदेश पोहचविण्यासाठी आलो. सगळे देवुनही गद्दारी केली त्यांना गाडू कालच्या पोटनिवडणुकीत पुण्यातील मतदानाचा टक्का घसरला ही चाललेल्या राजकारणाबद्दल जनतेच्या मनातील चीड असल्याचे त्यांनी सांगितले
अभियानासाठी शहर प्रमुख सनी वाघ, विधानसभा संघटक असलम शेख, ग्राहक मंच शहर प्रमुख रवी कथले यांनी विशेष परिश्रम घेतले.
यावेळी जिल्हाप्रमुख मुजीब शेख, ग्राहक मंच जिल्हाप्रमुख मुकुंद सिनगर,माजी नगराध्यक्ष संजय सातभाई, उपजिल्हाप्रमुख कैलास जाधव, युवासेना सहसचिव सुनीलभैया तिवारी, माजी नगरसेवक कालूआप्पा आव्हाड, रावसाहेब गुंजाळ, सुहास वहाडणे, अरुण पाटील, शिर्डी शहर प्रमुख संजय शिंदे, अशोक कानडे, महिला आघाडी शहर प्रमुख राखी विसपुते, गगन हाडा, सिद्धार्थ शेळके, भूषण पाटणकर, सारिका कुहिरे, पायल पवार, सागर फडे, बालाजी गोर्डै, मुन्ना मन्सुरी, आशिष निकुंभ, नितेश बोरुडे, नाना जाधव, आकाश कानडे,अमोल शेलार,सनी काळे, प्रसाद शेलार, विजय भोकरे,शिवा प्रकाश शेळके आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी शहरातील जाफर पठाण जफर पठाण,नईम पठाण, आक्रम शेठां,फरदीन खाटीक,अमन तांबोळी, आलकराज शेठा,
इमरान शेख,आनजर शेठा,सोरोब शेठा,
आरबाज शेठा,साहील पठाण,रेहान- शेठा
आकाश जोगधर,तोसिफ शेठा,आसीफ शेख, आमीन शेठा,सलमान शेख,सतु चव्हाण, अशोक भाऊ,समिर शेख सह २५ ते ३० मुस्लिम कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुकाप्रमुख शिवाजी ठाकरे यांनी केले तर सूत्रसंचालन माजी शहरप्रमुख भरत मोरे यांनी केले. शेवटी आभार श्रीरामपूरचे अशोक थोरे यांनी व्यक्त केले.
Post Views:
145