विनायक भालेराव यांचे निधन
Vinayak Bhalerao passed away
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Thu2 March23 ,20.00 Pm By राजेंद्र सालकर
कोपरगाव : विनायक दत्तात्रय भालेराव
(वय ८०) यांचे गुरूवारी (२ मार्च ) रात्री वृद्धापकाळाने ओझर (गणपती) येथील राहत्या घरी निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी अनुसया , दयाराम व बाळकृष्ण दोन मुले, माधुरी सालकर ही एक मुलगी, सुधा, ललिता व श्वेता या तीन सुना, साईली, विशाल, मयूर, साईप्रसाद, शुभम, धनश्री, आदित्य ही नातवंडे निखिल पाटणकर नात जावई श्रुती व पुजा नात सुना सयेशा पाटणकर ही पणती असा परिवार आहे. जुन्नर तालुक्यातील प्रसिद्ध विघ्नहर लॅबचे डॉ. ओंकार डॉ. संतोष व आर्मी इंजिनीयर राजेंद्र भालेराव यांचे ते चुलते होते. तर रमाकांत भालेराव यांचे ज्येष्ठ बंधू होते. दैनिक सामना दैनिक दैनिक पुण्यनगरी या वृत्तपत्रांचे कोपरगाव तालुका प्रतिनिधी पत्रकार राजेंद्र सालकर यांचे ते सासरे होते.
कैलासवासी विनायक भालेराव हे ओझर गणपती येथील प्रगतशील शेतकरी ओझर गणपती देवस्थानचे गुरव पुजारी होते मनमिळावू व मितभाषी असल्यामुळे त्यांचा परिसरातच दांडगा जनसंपर्क होता गेल्या काही महिन्यापासून ते आजारी होते गुरुवारी वयाच्या ८० वर्षी त्यांचे दुःखद निधन झाले.
गुरुवारी त्यांच्या पार्थिवावर ओझर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी ओझर पंचक्रोशीतील विविध संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते ओझर येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जुन्नर बाजार समिती संचालक शिरीष बोराडे, ह भ प अर्जुन महाराज शिंदे,सुर्यकांत रवळे, प्रकाश मांडे, विनायक मनसुख, संतोष बोराडे, अशोक जगदाळे, बाळासाहेब गवळी, दत्तात्रय मांडे, सचिन पंडित, यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.