कोपरगाव साईधाम मंदिरास अति.पोलीस महासंचालक संजय वर्मा यांची सपत्नीक भेट
Additional Director General of Police Sanjay Verma’s conjugal visit to Kopargaon Saidham temple
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Wed 8 March23 ,19.20 PmBy राजेंद्र सालकर
कोपरगाव : शहरा नजीक अंबिका नगर येथे असलेल्या श्री साई धाम मंदिरास राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक संजय वर्मा यांनी सपत्नीक, नातेवाईकासह भेट देऊन मनोभावे दर्शन घेतले याप्रसंगी विश्वस्त विजयराव नायडू यांनी त्यांचे स्वागत केले.
श्रद्धा सबुरीचा संदेश प्रत्येकाच्या जीवनात मोलाचा आहे असे वर्मा यावेळी बोलताना म्हणाले गेली १५ ते १६ वर्षापासून तेथील साईधाम मंदिरास आवर्जून दर्शनासाठी येतात १६ जुन रोजी साईबाबा मंदिर वर्धापन दिनास त्यांच्या पत्नी येथे आवर्जून हजेरी लावतात त्यांना येथील मंदिराचे संस्थापक कै. धोंडीरामबाबा चव्हाण यांचा व श्री साईबाबांचा कृपा आशीर्वाद मिळाला आहे तसेच प्रचिती ही आली आहे दरवर्षी ते येथे दर्शनासाठी हजेरी लावतात.
विश्वस्त विजयराव नायडू यांनी श्री वर्मा यांचा शाल श्रीफळ पुष्पहार घालून सन्मान केला. येथे आल्यानंतर आत्मिक समाधान शांती मिळते असे श्री वर्मा कुटुंबियांनी बोलताना सांगितले.
आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असलेल्या शिर्डी साईबाबांच्या समाधीचे दर्शनही त्यांनी याआधी घेतले याप्रसंगी रोहित वाघ, प्रकाश चव्हाण, अविनाश चव्हाण आदी उपस्थित होते.
Post Views:
248