दिवाणी न्यायालयासाठी २८  कोटीची निविदा – आ.  काळे

 दिवाणी न्यायालयासाठी २८  कोटीची निविदा – आ.  काळे

28 Crore Tender for Civil Court – Rs. the kale

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Thu 9 March23 ,11.30 Am By राजेंद्र सालकर

कोपरगाव : शहरातील दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या २८.२१ कोटीच्या कामाची निविदा प्रसिद्ध झाली आहे. अशी माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली आहे.

ब्रिटीश कालीन मुदतबाह्य न्यायालय इमारतीत दिवाणी व फौजदारी  कामकाज सुरु होते मात्र कामकाजात अडचणी येत असल्याच्या तक्रारी बार असोसिएशन आमदार आशुतोष काळे यांच्याकडे करून  न्यायालयाच्या इमारतीचा प्रश्न सोडवावा अशी मागणी केली होती. याचा पाठपुरावा करून आमदार आशुतोष काळे यांनी महा विकास आघाडीचे अर्थमंत्री ना. अजित पवार यांच्याकडून निधी मंजूर केला होता. त्या मंजुरीतून दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नवीन इमारतीच्या कामाची २८.२१ कोटीची निविदा प्रसिद्ध झाली आहे. त्यामुळे लवकरच नवीन इमारतीच्या कामास प्रारंभ होवून सर्व सुविधांनी पिपूर्ण असलेली सुसज्ज वस्तू उभी राहणार  असल्यामुळे बार असोसिएशनच्या सदस्यांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.

    

Leave a Reply

You cannot copy content of this page