राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत संजीवनी बी फार्मसी पहिल्या चार संघात
Sanjeevani B Pharmacy in the first four teams in the state level volleyball tournament
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Thu 9 March23 ,17.10 PmBy राजेंद्र सालकर
कोपरगांव: संजीवनी बी. फार्मसी महाविद्यालयाच्या व्हाॅलीबाॅल (मुले) संघाने शिवलिंगेश्वर काॅलेज ऑफ फार्मसी, अलमाला, ता. औसा, जि. लातुर या राज्यस्तरीय व्हालीबाॅल स्पर्धेत पहिल्या चार संघात स्थान पटकावुन क्रिडा क्षेत्रातही आपला दबदबा कायम ठेवला, असल्याची माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
या स्पर्धेत राज्यातील विविध बी. फार्मसी महाविद्यालयांमधुन एकुण ४८ संघांनी सहभाग नोंदविला. या स्पर्धेमध्ये आयोजक महाविद्यालयाने शिस्तबध्दरित्या उत्कृष्ट खेळ करणारे चार संघ निवडले, त्यात संजीवनी बी. फार्मसी महाविद्यालयाच्या संघाचा समावेश आहे. यामुळे संजीवनी बी. फार्मसी महाविद्यालयाचा नावलौकिक दर्जा व गुणवत्तापुर्वक शिक्षणा बरोबर क्रीडा क्षेत्रातही पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.
या संघात खेळाडू यश महेश गोसावी (कर्णधार), ओम संजय सोनवणे, जयेश राहुल आढाव, अखिलेश किशोर ठोंबरे, प्रतिक कैलास पवार, प्रणव सचिन कोते, ज्ञानेश महेश काशीद, साईराज संजय तुरकणे, सोमनाथ रामराव आव्हाड व ओम श्रीशैल्यासोमनाथ शिराळ यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. या खेळाडूंना प्रा. अगस्ती वारे व क्रीडा संचालक शिवराज पाळणे यांचे मार्गदर्शन लाभले.
संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी या सर्व खेळाडूंचा छोटेखानी कार्यक्रमात सत्कार करून अभिनंदन केले.
यावेळी बी. फार्मसी महाविद्यालयाचे डायरेक्टर डाॅ. विपुल पटेल, प्रा. वारे व प्रा. पाळणे उपस्थित होते. तसेच अध्यक्ष नितिनदादा कोल्हे, विश्वस्त सुमित कोल्हे यांनीही सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले.