जिनिंग प्रेसिंग सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध

जिनिंग प्रेसिंग सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध

Ginning Pressing Society Quinquennial Election Unopposed

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Fir 10 March23 ,15.00 Pm By राजेंद्र सालकर

कोपरगाव : कोपरगाव तालुका सहकारी कापूस जिनींग अँड प्रेसिंग सोसायटीची २०२३ ते २०२८ या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूकीसाठी शेवटच्या दिवसापर्यंत एकूण १३ जागांसाठी १३ उमेदवारी अर्ज दाखल झाल्यामुळे  निवडणूक  बिनविरोध झाली असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी नामदेवराव ठोंबळ यांनी जाहीर केले आहे.

माजी आमदार अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली व आमदार आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक बिनविरोध पार पडली आहे.
        कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समुहाचे संस्थापक कर्मवीर शंकरराव काळे  यांनी कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या कापसाला योग्य दर मिळावा यासाठी कोपरगाव येथे जिनींग अँड प्रेसिंग सोसायटीची स्थापन करून शेतकऱ्यांचे हित जोपासले. ही संस्था सातत्याने प्रगतीपथावर आहे. 
             
बिनविरोध निवडून आलेले सदस्य पुढीलप्रमाणे गोरक्षनाथ ज्ञानदेव जामदार,सचिन वसंतराव आव्हाड,गणेश शंकरराव गायकवाड,पाराजी दादा गवळी,नानासाहेब शशिकांत चौधरी, संदीप सुदाम शिंदे, नानासाहेब भागवत निकम, महेश बाळासाहेब लोंढे, संजय विठ्ठल संवत्सरकर, सुभाष भास्करराव सोनवणे, शंकर यमाजी गुरसळ, सौ.विमलबाई ज्ञानदेव गवारे, सौ. कांताबाई धर्मा दहे या सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे. सर्व नवनिर्वाचित सदस्यांचे कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समुहाचे मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे, आमदार आशुतोष काळे यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत. 
सर्व नवनिर्वाचित सदस्यांनी माजी आमदार अशोकराव काळे, आमदार आशुतोष काळे यांचे आभार मानले असून संस्था सातत्याने प्रगतीपथावर घेवून जाण्यासाठी विश्वासाने दिलेली जबाबदारी पार पाडणार असल्याचे सांगितले आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page