कोपरगावात शिवसेनेतर्फे शिवजयंती उत्साहात;  भव्य मिरवणूक

कोपरगावात शिवसेनेतर्फे शिवजयंती उत्साहात;  भव्य मिरवणूक

Shiv Jayanti by Shiv Sena in Kopargaon; A grand procession

ढोल-ताशांच्या गजरात,छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने  दुमदुमले…Chhatrapati Shivaji Maharaj’s shouts echoed in the sound of drums and cymbals…

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Sat11 March23 ,13.20 Pm By राजेंद्र सालकर

कोपरगाव  : ‘जय भवानी… जय शिवाजी… छत्रपती शिवाजी महाराज की जय…’ अशा जयघोषाने आणि ढोल-ताशांच्या गजराने कोपरगाव  शहर दुमदुमून गेले होता. सर्वत्र लावलेल्या भगव्या ध्वजांमुळे सारे वातावरण भगवेमय झाले होते. शुक्रवारी (दि. १०) तिथीप्रमाणे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्रीमंत छत्रपती शिवरायांची जयंती भगवेमय वातावरण आणि आकर्षक सजावटीच्या माध्यमातून उत्साहात साजरी  करण्यात आली. शिवप्रतिमेला पुष्पहार अर्पून अभिवादन करण्यात आले. सायंकाळी  शहरामध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वतीने भव्य दिव्य अशी मिरवणूक काढण्यात आली.

यावेळी शिवप्रेमींनी रस्त्यांवर मोठी गर्दी केली होती. जिल्हाप्रमुख प्रमोद लबडे तालुका प्रमुख शिवाजी ठाकरे, शहर प्रमुख सनी वाघ, विधानसभा संघटक असलम शेख, कामगार सेना अध्यक्ष भरत मोरे, उपजिल्हाप्रमुख कैलास जाधव, महिला जिल्हाप्रमुख सपना मोरे, शहर प्रमुख राखी विसपुते यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
शुक्रवारी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे प्रारंभी सकाळी ६ वाजता  शिवाई मंदिरातील पावन  शिवज्योतीची पुजा करण्यात आली त्यानंतर छत्रपती शिवरायांना ५१ जोडप्यांच्या साक्षीने मंत्रोच्चारात  छत्रपती शिवरायांना पंचामृताचा शिवमस्तकाभिषेक करण्यात आला. यावेळी २१ उखळी तोफांची सलामी देण्यात आली. शिवरायांच्या दर्शनासाठी शिवप्रेमींनी  गर्दी केली होती. या वेळी ‘जय भवानी-जय शिवाजी’च्या घोषणा देण्यात आल्या.
सायंकाळी पाच वाजता अहिंसा चौकातून रथात शिव महाराजांची प्रतिमा ठेवून शिवप्रेमींनी भगवे ध्वज हातात घेऊन, भगव्या रंगाचे फेटे बांधून  लाठी काठीचे खेळ, भालदार चोपदार, मावळढोक, नाचणारा घोडा यांसारखे शिवकालीन मर्दानी खेळ सादर करीत ढोल ताशांच्या गजरात कोपरगाव शहर उध्दव ठाकरे शिवसेनेच्या वतीने भव्य मिरवणूक  काढण्यात आली होती. मिरवणुकीत  महिलांनी फुगडीचा फेर धरला. शिवरायांच्या जयघोषात आणि ढोलताशांच्या निनादानी शहरातील वातावरण शिवमय झाले होते. छत्रपती शिवरायांबद्दलचे प्रेम, आदर आणि अभिमान व्यक्त करण्यासाठी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वच जण मिरवणुकीत गर्दी करताना दिसत होते. अनेक लहान मुलांनी शिवरायांच्या तसेच लहान मुलींनी जिजाबाईंची वेशभूषा केलेली दिसत होती. एकूणच शहराचे वातावरण भगवे झालेले आढळून आले. शिवरायांच्या जीवनपटावरील लेझर शो व कोपरगावात पहिल्यांदाच होत असलेला भव्य दिव्य अशा फायर शोने कोपरगावकरांना  दिपवून टाकले. थेट शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत रथावर आरूढ येवला येथील कलाकार गणेश सोमवंशी सर्वांचे  लक्ष वेधून घेत होते
रात्री पावणेदहा वाजता जिल्हाप्रमुख श्री प्रमोद लबडे व सौ वैशाली लबडे व उत्सव समिती अध्यक्ष कालु अप्पा आव्हाड यांच्या हस्ते शिवरायांच्या महाआरतीने मोठ्या जल्लोषात व उत्साहात भक्तीपूर्ण वातावरणात मिरवणुकीची व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली
शिवजयंतीनिमित्त शुक्रवारी सांस्कृतिक तसेच सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.शहरातील अहिंसा चौकामध्ये आकर्षक सजावट केली होती. छत्रपती शिवाजी महाराजांचा लक्षवेधी सिंहासनाधीष्ठित पुतळा उभारण्यात आला होता.शहरात विविध शिवसेना शाखेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा उभारण्यात आली होती. तसेच साई तपोभूमी चौकातील  रिक्षा स्टॅन्डच्या  वतीने साई तपोभूमी चौकात मंडप उभारून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले. आरती व महाप्रसादाचे वाटप करण्यात आले  तसेच, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील पोवाडेसुद्धा लावण्यात आलेले होते. 
उत्सव समितीचे कालुअप्पा आव्हाड (अध्यक्ष),गगन हाडा (कार्याध्यक्ष),नाना जाधव, आकाश कानडे,अमोल शेलार,सनी काळे(उपाध्यक्ष), नवश्या गणपती (शिवनेरी शिवज्योतची मान), प्रसाद शेलार (शिवज्योतप्रमुख), विजय भोकरे,शिवा चंदनशीव (मिरवणूक प्रमुख),योगेश बागुल, शिवनारायण परदेशी, सिध्दार्थ शेळके (शिवमस्तकाभिषेक नियोजन प्रमुख),जाफर पठाण (सेक्रेटरी),गणेश जाधव(सोशल मीडिया)  महेश गायकवाड, आशिष निकुंभ, शिवम नागरे ,ऋषी धुमाळ, वसीम पटेल, वसीम चोपदार, मयुर खरनार, विक्रांत बागल,विकी मोरे, राहुल साटोटे (नियोजन समिती),मनोज कपोते  (गोंदिया संपर्कप्रमुख), सागर फडे (उपतालुकाप्रमुख) , सारिका कुहिरे, पायल पवार, उपशहरप्रमुख भुषण पाटणकर, बालाजी गोर्डे, आकाश कानडे, युवासेना तालुका प्रमुख सिध्दार्थ शेळके, युवासेना शहरप्रमुख नितेष बोरूडे, ग्राहक संरक्षण कक्ष शहरप्रमुख रवी कथले, व्यापारी सेना शहर प्रमुख योगेश मोरे, वसीम चोपदार , माजी नगराध्यक्ष संजय सातभाई, मुन्ना मन्सुरी,  मनोज विसपुते, प्रकाश शेळके, सुनिल भगत, शिवनारायण परदेशी, पप्पू पडीयार, वाल्मिक चिने,सोनु पाठक आदींसह उद्धव ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
आमदार आशुतोष काळे यांच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे  शहराध्यक्ष सुनील गंगुले, संजीवनी कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे, अमृत संजीवनी ट्रान्सपोर्ट चे अध्यक्ष पराग संधान, माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, माधवराव पतसंस्थेचे चेअरमन विजय आढाव भाजपा शहराध्यक्ष दत्ता काले माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे माजी नगराध्यक्ष रवींद्र पाठक दिलीप दारूणकर ज्येष्ठ अभियंते अनिल सोनवणे  मुस्लिम समाज सेवा फाउंडेशनचे वतीने अभिवादन करण्यात आले यावेळी शिवसेना  शिवसेनेच्या वतीने या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला

Leave a Reply

You cannot copy content of this page