कोपरगाव मतदार संघातील २५ किमीच्या रस्त्यांसाठी २३ कोटींची  प्रशासकीय मान्यता-आ. आशुतोष काळे 

कोपरगाव मतदार संघातील २५ किमीच्या रस्त्यांसाठी २३ कोटींची  प्रशासकीय मान्यता-आ. आशुतोष काळे 

23 crore administrative approval for 25 km roads in Kopargaon constituency-A. Ashutosh Kale

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Sat11 March23 ,18.20 Pm By राजेंद्र सालकर

कोपरगाव : ग्रामीण भागातील दळणवळण वाढावे, यासाठी प्रलंबित असलेल्या वारी-कान्हेगाव ते संवत्सर रस्ता, प्र.जि.मा.८४ ते पोहेगाव-देर्डे चांदवड ते कुंभारी रस्ता व ओगदी ते पढेगाव या महत्वाच्या एकूण २५ किलोमीटर रस्त्यांसाठी २३.२७ कोटीची प्रशाकीय मान्यता मिळाली असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे. हा मार्ग ग्रामीण जनतेसाठी वरदान ठरणार आहे. 

त्याच खराब रस्त्याचा वापर करत जावे लागत होते. आ. आशुतोष काळे  यांनी या मार्गाचा प्रश्न मनावर घेऊन त्यास निधीची मंजुरी मिळवून आणल्याने मोठा प्रश्न त्यांनी सोडविला आहे.आ  काळे  यांनी मागील साडे तीन वर्षात  सातत्याने पाठपुरावा करून वारी-कान्हेगाव ते संवत्सर रस्ता (१०.७४ कोटी), प्र.जि.मा.८४ ते पोहेगाव-देर्डे चांदवड ते कुंभारी रस्ता (७.८१ कोटी) व ओगदी ते पढेगाव (४.७२ कोटी) या दळणवळणाच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या एकूण २५ किलोमीटर रस्त्यांसाठी २३.२७ कोटीची प्रशाकीय मान्यता मिळाली आहे.गेल्या अनेक वर्षांची मागणी असलेल्या रस्त्याला मंजुरी मिळून निधी प्राप्त केला आहे़. 
महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचा निधी आणून खराब रस्त्यांना वैतागलेल्या नागरिकांना दिलासा दिला आहे. 

Leave a Reply

You cannot copy content of this page