कोपरगाव मतदार संघातील शिर्डी विमानतळ प्रवाशी टर्मिनसह रस्त्यासाठी ५५२ कोटी – सौ कोल्हे 

कोपरगाव मतदार संघातील शिर्डी विमानतळ प्रवाशी टर्मिनसह रस्त्यासाठी ५५२ कोटी – सौ कोल्हे 

552 crore for road including Shirdi Airport Passenger Terminal in Kopargaon Constituency – Sou Kolhe

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Sun12 March23 ,16.00 Pm By राजेंद्र सालकर

कोपरगाव : राज्याच्या अर्थसंकल्पात  कोपरगाव मतदार संघातील शिर्डी विमानतळ प्रवाशी टर्मिनसह रस्त्यासाठी ५५२.५० कोटी  निधीची तरतूद केल्याबद्दल कोपरगाव मतदार संघाच्या माजी आमदार भाजपा प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी कर्जत येथील कार्यक्रमात स्वागत व सत्कार करताना कोपरगाव  जनतेच्या वतीने आभार व्यक्त केले.

शिर्डी हे जागतिक दर्जाचे तीर्थस्थळ असून, या ठिकाणी दररोज देश-विदेशातून असंख्य साईभक्त येत असतात. शिर्डीला येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी कोपरगाव तालुक्यातील काकडी येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू करण्यात आलेले असून, या विमानतळावर नवीन अद्ययावत प्रवासी टर्मिनल उभारण्यासाठी ५२७ कोटीचा निधी मंजूर केला आहे.तर या अर्थसंकल्पात कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील विविध रस्त्यांसाठी २५.५० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. चास-वडगाव-बक्तरपूर जिल्हा हद्द रस्ता (प्र.जि.मा.०८) रा.मा. ६५ (कोपरगाव ते धारणगाव रस्ता), रा. मा.०७ धामोरी, येसगाव रस्ता (प्र.जि.मा.०४) येसगाव-खिर्डी गणेश-बोलकी रस्ता सुधारणा करणे (४ कोटी), बक्तरपूर जिल्हा हद्द रस्ता (प्र.जि.मा.०८), (मंजूर गाव ते बक्तरपूर रस्ता), रा.मा.६५ अंजनापूर ते रांजणगाव देशमुख रस्ता, उक्कडगाव रस्ता रा.मा.६५ (करंजी फाटा ते कॅनॉलपर्यंत रस्ता) मध्ये सुधारणा, रा.म.मा.५० (रा.मा.३६) शिंगवे ते बनकर वस्ती रस्ता सुधारणा, रामपूर वाडी ते पुणतांबा रस्ता (प्रजिमा ८७) मध्ये सुधारणा, रा.मा. ७ रस्ता (प्रजिमा ८५) सा. क्र.०/५०० मध्ये कुंभारी येथील गोदावरी नदीवरील मोठ्या पुलाची दुरुस्ती अशा विविध कामांसाठी या अर्थसंकल्पात २५.५० कोटी रुपयांहून अधिक निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून आता मतदारसंघातील अनेक महत्वाच्या रस्त्यांची कामे मार्गी लागणार आहे. देवेंद्र फडणवीस यांनी कोपरगाव मतदारसंघाला ही अनोखी भेट दिली असल्याचे स्नेहलता कोल्हे यांनी सांगितले.

Leave a Reply

You cannot copy content of this page