पुणतांबा परिसरातील रस्त्यांसाठी ९.६३  कोटीची प्रशासकीय मान्यता – आ.आशुतोष काळे

पुणतांबा परिसरातील रस्त्यांसाठी ९.६३  कोटीची प्रशासकीय मान्यता – आ.आशुतोष काळे

9.63 crore administrative approval for roads in Puntamba area – A. Ashutosh Kale

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Sun12 March23 ,16.10 Pm By राजेंद्र सालकर

कोपरगाव : मतदार संघातील पुणतांबा ते नपावाडी संभाजीनगर ते वाकडी  या दोन्ही रस्त्यांसाठी ९.६३ कोटी निधीस प्रशासकीय मान्यता मिळाली असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली आहे.

मागील पाच वर्षात कोपरगाव विधानसभा मतदार संघाच्या राहाता तालुक्यातील अकरा गावातील रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण होवून नागरिकांना रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता हेच कळत नव्हते. त्यामुळे अपघाताला निमंत्रण देणाऱ्या या रस्त्याने जाण्याचे नागरिक टाळत होते. परिणामी मोठी बाजारपेठ असलेल्या पुणतांबा गावाच्या बाजारपेठेची आर्थिक उलाढाल मंदावली होती. विकासाच्या बाबतीत  साडे तीन वर्षात या अकरा गावातील अनेक रस्त्यांना कोट्यावधीचा निधी दिला आहे.

त्यामुळे पुणतांबा-नपावाडी ग्रामस्थांची मागणी पूर्ण करण्यासाठी केलेल्या पाठपुराव्यातून पुणतांबा-नपावाडी या साडे पाच किलोमीटर रस्त्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक टप्पा २ योजना (सर्वसाधारण) (डीपीसी) अंतर्गत ५.२० कोटी व संभाजीनगर ते वाकडी या रस्त्यासाठी ४.४३ कोटी असा एकूण ९.६३ कोटीच्या निधीस प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण होवून या रस्त्याच्या कामाला प्रारंभ होणार आहे.  ग्रामस्थांनी आ. आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे.

  

चौकट : सरपंच सौ.पल्लवी ईल्हे, सदस्य सौ.वैशाली धनवटे,धनंजय उगले, मयूर वहाडणे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे  आ. आशुतोष काळे यांनी या रस्त्याचा प्रश्न सोडविला आहेत्यामुळे नपावाडी, रामपूरवाडीच्या ग्रामस्थांचा पुणतांबा गावाशी तुटलेला संपर्क पुन्हा जोडला जावून पुणतांबा गावची बाजारपेठ पुन्हा एकदा गजबजणार आहे.

-राजेंद्र धनवटे (माजी सरपंच नपावाडी)

 

Leave a Reply

You cannot copy content of this page