कांदा प्रतिक्विंटल ३०० रुपये सानुग्रह अनुदान;  निर्णय स्वागतार्ह – सौ.कोल्हे

कांदा प्रतिक्विंटल ३०० रुपये सानुग्रह अनुदान;  निर्णय स्वागतार्ह – सौ.कोल्हे

Concession subsidy of Rs 300 per quintal of onion; Decision welcome – Ms. Kolhe

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Mon13 March23 ,19.40 PmBy राजेंद्र सालकर

कोपरगाव : गेल्या काही दिवसांपासून कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात नाराज होते. त्यांच्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी विधानसभेत ३०० रुपये सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा स्वागताहार्य  असल्याची प्रतिक्रिया भाजपा प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी  व्यक्त केली आहे.

स्नेहलता कोल्हे पुढे म्हणाल्या, शिंदे-फडणवीस सरकार हे जनतेचे सरकार आहे. हे सरकार जनतेच्या हितासाठी काम करत आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यभरातील घाऊक बाजारपेठांमध्ये कांद्याचे दर गडगडले आहेत. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडले होते. सध्या राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. दरात घसरण झाल्यामुळं शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. राज्यात अडचणीत सापडलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ३०० रुपये सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (१३ मार्च) विधानसभेत केली. या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार त्यांनी  मानले आहेत.

Leave a Reply

You cannot copy content of this page