मनरेगाकडून विकासासाठी २.३० कोटी निधी मंजूर – आ. आशुतोष काळे
2.30 crore funds approved for development from MNREGA – A. Ashutosh Kale
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Tue14 March23 ,19.40 PmBy राजेंद्र सालकर
कोपरगाव : नियोजन विभाग रोजगार हमी योजना (मनरेगा)विभागाकडून प्रस्तावांना मंजुरी मिळून ग्रामीण भागाच्या अंतर्गत रस्त्यांसाठी २ कोटी ३० लक्ष निधी मंजूर झाला असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.
मतदार संघातील बहुतांश रस्त्यांचे प्रश्न मार्गी लावले असून अनेक रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत. काही रस्त्यांची कामे प्रगतीपथावर असून काही रस्त्यांच्या कामांची निविदा प्रक्रिया सुरु आहे. पाठपुराव्यातून मतदार संघातील १३ गावांना महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या (मनरेगा) माध्यमातून ०२ कोटी ३० लक्ष निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून गाव अंतर्गत रस्ते सिमेंट कॉंक्रीटिकरण करणे व पेव्हिंग ब्लॉक बसविणे आदी विकास कामे केली जाणार आहे.
यामध्ये पुढीलप्रमाणे १३ गावांसाठी निधी मंजूर करण्यात आला असून यामध्ये
चांदेकसारे (१५ लक्ष), चासनळी (३५ लक्ष), डाऊच खु. (१५ लक्ष), डाऊच बु.. (१५ लक्ष),धामोरी (२० लक्ष), बक्तरपूर (२० लक्ष), मोर्विस (१५ लक्ष), रवंदे (२० लक्ष), वेस सोयेगाव (१५ लक्ष) तसेच मतदार संघातील राहाता तालुक्यातील नपावाडी (१५ लक्ष), जळगाव (१५ लक्ष), वाकडी (१५ लक्ष), शिंगवे (१५ लक्ष) असा एकूण २.३० कोटी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे वरील गावातील अंतर्गत रस्त्यांचा विकास होण्यास मदत होणार आहे.