Snehlata Kohle : महिलांना बसच्या तिकिटावर ५० टक्के सवलत दिल्यानंतर स्नेहलता कोल्हे यांचा बसने प्रवास |Kopargoan

Snehlata Kohle : महिलांना बसच्या तिकिटावर ५० टक्के सवलत दिल्यानंतर स्नेहलता कोल्हे यांचा बसने प्रवास |Kopargoan

Snehlata Kohle: Snehlata Kohle travels by bus after 50 percent discount on bus tickets for women |Kopargoan

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Mon 20 March23 ,19.10 Pm By राजेंद्र सालकर

कोपरगाव : भाजपा प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे  यांनी महिला पदाधिकाऱ्यांसह कोपरगाव ते संगमनेर  बस प्रवास केला. महिलांना बसमध्ये ५० टक्के तिकिटावर सवलत दिल्यानंतर स्नेहलता कोल्हे यांनी बसने प्रवास करून आनंद व्यक्त केला. कोपरगाव येथील  बस स्थानकातून त्यांनी कोपरगाव भाजपमधील महिला पदाधिकारी व माजी नगरसेविकांनीही सहप्रवासी म्हणून माजी महिला आमदारांसोबत पुणतांबा फाटापर्यंत प्रवास केला. 

त्यामध्ये शहराध्यक्षा वैशाली आढाव, शिवसेना शिंदे गटाच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष विमल पुंडे, विद्या सोनवणे, शिल्पा रोहमारे, विजया देवकर, हर्षा कांबळे, नंदा भंडारी अनिता साळवे, मीना भारूड, सविता परदेशी, सुरेखा आवारे या आपल्या  पदाधिकारी महिला समवेत हा बस प्रवास सुरू केला. महिलांचे प्रश्न जाणून घेतले.
तत्पूर्वी बस स्थानकात महिलांना पेढे वाटून सरकारने केलेल्या या घोषणेचा  आनंद व्यक्त केला. यावेळी महिलांनी त्यांनी ‘५० टक्के… महिला ओक्के’ असा नाराही लगावला.

५० टक्के, एकदम ओक्के’, सवलतीने महिला खुश; साधी बस असो की शिवशाही, तिकीट अर्धेच

सौ स्नेहलता कोल्हे म्हणाल्या की, 
‘महिला सन्मान योजने’अंतर्गत सरसकट सर्व महिलांना एस.टी. प्रवासात ५० टक्के सवलत देण्यात येत आहे. हा सवलत देण्याचा ऐतिहासिक निर्णय सरकारने घेतला. त्याची अंमलबजावणी केली जात आहे. आज सोमवारी (२०) रोजी दुपारी चारच्या सुमारास कोपरगाव संगमनेर या एसटी बसने आम्ही प्रवास केला. महिलांना न्याय देणारे राज्य सरकार आहे. नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पात या सरकारने महिलांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत. त्यामध्ये एसटीने प्रवास करणा-या महिलांना तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्याच्या निर्णयाचाही समावेश आहे. या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्यातून राज्यातील माज्या महिला भगिनींना प्रवास करण्यासाठी मोठा दिलासा मिळालेला आहे.
यावेळी उपस्थित महिलांनी या निर्णयामुळे महिलांना आता अर्ध्या तिकिटात प्रवास करण्याची संधी मिळाली आहे. हा निर्णय आम्हा महिलांसाठी खूपच फायद्याचा ठरला आहे, अशा प्रतिक्रिया  महिला व विद्यार्थिनींनी व्यक्त करून शिंदे-फडणवीस सरकारचे आभार मानले.

चौकट

माजी महिला आमदार स्नेहलता कोल्हे यांच्यासोबत बस व बस बाहेर आगारातील विविध महिलांची व शालेय विद्यार्थिनींची सेल्फी काढण्याची चढाओढ पाहता  माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांची महिला मधे असलेली क्रेझ आजही कायम आहे 

 .

Leave a Reply

You cannot copy content of this page