गोदावरी महिला पतसंस्थेची पहिली खाजगी कृषी उत्पन्न बाजार समिती
First Private Agricultural Produce Market Committee of Godavari Women’s Credit Institution
महंत रामगिरी महाराजांच्या हस्ते शुभारंभ Inaugurated by Mahant Ramgiri Maharaj
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Tue 21 March23 ,19.10 Pm By राजेंद्र सालकर
कोपरगांव : कोपरगाव तालुक्यातील ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळावा यासाठी गोदावरी महिला नागरी पतसंस्था सांगवीभुसार यांनी तालुक्यातील पहिली खाजगी कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापन केली या बाजार समितीचे शुभारंभ गोदाधामचे महंत रामगिरी महाराज यांनी सोमवारी केले.
यावेळी जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे पुढे म्हणाले की,मुक्त अर्थव्यवस्थेत स्पर्धा अनिवार्य आहे . शेतीला व्यवसाय मानून उद्योजक प्रवीण शांताराम कदम या शेतकरीपुत्राने वीस एकर क्षेत्रावर ही बाजार समिती स्थापन करून धाडसी पाऊल उचलले आहे, हे स्वागतार्ह असून याचा अभिमान असून संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्यामार्फत सहकार्य करू अशी ग्वाही दिली
प्रारंभी या बाजार समितीचे संस्थापक व माजी सरपंच शांताराम बाबुराव कदम यांनी उपस्थितांचे स्वागत केले. प्रविण शांताराम कदम व संदिप शांताराम कदम यांनी राज्य पणन संचालक विनायक कोकरे व जिल्हा मुख्य प्रबंधक गणेश पुरी यांच्या मार्गदर्शक सुचनांचे तंतोतंत पालन करून शेतकरी हीतासाठी खाजगी बाजार समिती उपक्रमाची माहिती दिली. कोपरगांव तालुका सहायक निबंधक नामदेवराव ठोंबळ यांनी कार्यपध्दती सांगितली.
विवेक कोल्हे पुढे म्हणाले,माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी राज्यात सर्वप्रथम डंकेल प्रस्ताव, गॅट करार, खाजगीकरण उदारीकरण जागतिकीकरण अंतर्गत आंतरराष्ट्रीय शेती व्यापार करारात येथील शेतक-याला संरक्षण कसे मिळेल यासाठी जनजागृती केली. मुक्त अर्थव्यवस्थेत स्पर्धा होते त्यातुन विकसीत विरूद्ध विकसनशील देशातील शेतकरी आणि त्यांच्यातील तफावत याचा अभ्यास करून त्याबाबत देशपातळीवर कृषि विभागाची ध्येय धोरणे काय असावी याबाबतची मांडणी केली. इंटरनॅशनल फोरम फॉर इंडियन अॅग्रीकल्चर या संस्थेमार्फत त्यांनी येथील शेतकरी व त्याच्या शेतमाल हितासाठी जाणिवपुर्वक प्रयत्न केले. ग्रामिण अर्थकारणाला संजीवनी उद्योग समुह व कोल्हे सहकारी साखर कारखान्याची जोड देत सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले. असे सांगून गोदावरी कृषी उत्पन्न खाजगी बाजार समितीने शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करावे असे शुभेच्छा दिल्या
.
याप्रसंगी महानंदचे अध्यक्ष राजेश परजणे, रंवदे येथील शिवशंकर उद्योग समुहाचे संस्थापक साहेबराव कदम, सरपंच भानुदास भवर, कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे संचालक बाळासाहेब कदम, उपसरपंच संदिप कदम, साहेबराव लामखडे, भिमराव भूसे, ऋषीकेश कदम, बिच्चुनाना जाधव, सोपानराव कासार, राजेंद्र कासार, शरदराव गडाख, मधुसुदन मोरे,महेश कदम, कोपरगांव तालुका भाजपाचे उपाध्यक्ष डॉ राजकुमार दवंगे, प्रकाश वाघ, सुदाम गाडे यांच्यासह रवंदे, मळेगांवथडी, सांगवीभुसार, मायगांवदेवी, धामोरी पंचक्रोशीतील सर्व शेतकरी विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी, सहकारी, महिलाभगिनी मोठया संख्येने उपस्थित होते.
शेवटी शांताराम कदम यांनी आभार मानले. संजीवनी उद्योग समूहाचेवतीने महंत रामगिरी महाराज यांचा यावेळी सत्कार करण्यात आला
Post Views:
369