गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर काळे परिवाराकडून श्री महेश्वराचे दर्शन
Darshan of Shri Maheshwar by Kale Parivar on the occasion of Gudi Padwa
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Wed 22 March23 ,17.10 Pm By राजेंद्र सालकर
कोपरगाव : तालुक्यातील सर्वात मोठ्या व कोळपेवाडीसह पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री महेश्वर महाराज यांचे गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर माजी आमदार अशोक काळे, आ. आशुतोष काळे,सौ. चैताली काळे अभिषेक काळे, डॉ.सौ.मेघना देशमुख, सर्व काळे परिवाराने यात्रेच्या निमित्ताने मनोभावे दर्शन घेतले.
यावेळी काढण्यात आलेल्या कावड यात्रेत आ. आशुतोष काळे यांनी खांद्यावर कावड घेवून कावड यात्रेत सहभागी झाले.
याप्रसंगी काळे साखर कारखान्याचे संचालक सूर्यभान कोळपे, वाल्मिकराव कोळपे, आदींसह यात्रा कमिटी सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जीवघेणे कोरोना संकट असल्यामुळे दोन वर्ष यात्रोत्सव झाला नाही मात्र श्री महेश्वर महाराजांच्या कृपेने हे संकट दूर झाले असून मागील वर्षापासून गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर कोळपेवाडी व पंचक्रोशीतील नागरिकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री महेश्वर महाराजांचा यात्रोत्सव पुन्हा मोठ्या उत्साहात सुरु झाला आहे. यावर्षी देखील यात्रा कमिटीने नागरिकांसाठी विविध धार्मिक व मनोरंजनाचे कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. गळीत हंगाम सुरु असून ऊस तोडणी मजुरांची देखील श्री महेश्वर महाराजांवर मोठी श्रद्धा आहे. त्यामुळे याहीवर्षी यात्रेत गर्दीचा उंचांक होणार असून मोठी आर्थिक उलाढाल होणार आहे. यात्रेकरूंच्या सुरक्षेसाठी यात्रा कमिटीच्या वतीने सीसीटीव्हीची कॅमेरे लावण्यात आले आहे आ. आशुतोष काळे यांनी समाधान व्यक्त करून शांततेत यात्रा उत्सव साजरा करावा अशा सूचना देवून सर्वाना नववर्षाच्या व गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या.