पाडवा पहाट प्रसन्न आणि मंगलमय वातावरणात संपन्न
Padwa morning is blessed with pleasant and auspicious atmosphere
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Wed 22 March23 ,17.20 Pm By राजेंद्र सालकर
कोपरगाव : शहरात गुढीपाडवा निमित्त प्रातःकालीन पहाट पाडवा साजरा करण्याची परंपरा साई गाव पालखी यांनी सुमारे आठ दहा वर्षांपासून सुरू केली. या स्वरोत्सवाची सुचिर्भूतता, चैतन्य, मांगल्य, उपस्थितांचे मन प्रसन्न करते. कलावंतांनाही यापेक्षा जास्त काय हवे असते ? बुधवारी २२ मार्च २०२३ रोजी तहसील कचेरी शेजारील साई गाव पालखीच्या संत ज्ञानेश्वर नगरी रंगमंचावर मान्यवरांच्या आणि रसिक प्रेक्षकांच्या साक्षीने पाच वर्षाच्या लहान चिमुकल्यापासून ७० ते ८० वर्षाच्या अबाल वृद्धांची मैफल सजली. भक्ती गीतांनी भक्तिमय वातावरणात नवीन वर्षाचे स्वागत केले.
जेष्ठ नागरिक सेवा मंच, जेष्ठ महिला समिती, साई सेवा भक्त मंडळ व शारदा संगीत विद्यालय यांच्या वतीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. दीप प्रज्वलनाने झाली नवीन वर्षाचे स्वागत केले.गायक केतन कुलकर्णी, सुरभी कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला
जेष्ठ नागरिक सेवा मंचच्या अध्यक्षा सौ सुधा भाभी ठोळे, कैलासशेठ ठोळे, विजय बंब, उत्तम भाई शहा, डॉ विलास आचार्य, साई सेवा भक्त मंडळाच्या जेष्ठ महिला भगिनी, ( आर टी ओ ऑफिसर ) आदींच्या हस्ते ( ब्रम्हधवज ) गुढीचे पुजन करून गुढी उभारण्यात आली.
प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ पुष्पाताई काळे, जेष्ठ नागरिक सेवा मंचचे उपाध्यक्ष दत्तोपंत कंगले, लेखा परीक्षक नितीन डोंगरे, माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे, शहरातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
पहाट पाडवा संपन्न झालेवर महिलांची दुचाकी शहर फेरी संपन्न झाली.
Post Views:
134