आठ वर्षानंतर ही कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न प्रलंबितच; त्यांनाच विचारा? सौ.स्नेहलता कोल्हे
After eight years, the water issue of Kopargaon city is still pending; Ask them? Mrs. Snehlata Kolhe
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Fir 23 March24 ,16.10 PmBy राजेंद्र सालकर
कोपरगाव : या प्रश्नावर बोलतांना त्या म्हणाल्या, खरे तर हा प्रश्न तुम्ही आमदारांनाच विचारला पाहिजे त्यांनीच निवडणुकीत कोपरगावच्या शहरातील लोकांना पाच नंबर साठवण तलावाच्या माध्यमातून दररोज किंवा दिवसाआड स्वच्छ शुद्ध पाणी देण्याचे आश्वासन देऊन तहान भागणार असल्याचा विश्वास दिला होता आणि आमदारकी पदरात पाडून घेतली होती अशी टीका माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी आमदार आशुतोष काळे यांच्यावर त्यांचा नामोल्लेख टाळून केली.

त्यापुढे म्हणाल्या, पाण्याच्या आशेने तहानलेल्या कोपरगावकरांनी भरभरून मतदान केले, आमदारकी दिली, पवार साहेबांनी संस्थांचे अध्यक्षपद दिले दुहेरी योग जुळून आला होता. काहीही न करता नुसता सहीचा कोंबडा मारायचा होता. तरीही निळवंडे शिर्डी कोपरगाव संयुक्त पाणीपुरवठा योजना करता आली नाही. हे कोपरगावकरांचे दुर्दैव असल्याची भावना सौ कोल्हे यांनी शुक्रवारी (२४) रोजी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौकातील एका जाहीर कार्यक्रमात व्यक्त केली.
कोपरगाव शहराला दररोज स्वच्छ शुद्ध पाणी मिळावे यासाठीच्या आम्ही केलेल्या निळवंडे पाणी योजनेच्या प्रयत्ना प्रयत्नाला सुरुंग लावण्यासाठी ज्यांनी कोर्टकचेऱ्या केल्या,काड्या खोडया घालणाऱ्या विरुद्ध तेंव्हा गाव एकत्र आले पाहिजे होते. तेव्हा त्या चांगल्या पाणी योजनेला गावाने सुद्धा पाठिंबा द्यायला हवी होती, काड्या खोडा घालणाऱ्या विरुद्ध गावाने दबाव गट केला पाहिजे होता, आमच्या प्रयत्नाला तुमची अर्थात गावाची साथ हवी होती तेवढी ती मिळाली नाही हेही दुर्दैवच म्हणावे लागेल.
दोन्ही ठराव आम्हीच मंजुर केले
नगरपालिकेत सत्ताधारी असताना सेना-भाजप रिपांई मित्र पक्षाच्या आमच्या नगरसेवकांनी अशाप्रकारे अविश्वासाचे खेळ खेळण्यात वेळ घालविण्यापेक्षा शहराची तहान भागविण्याकडे लक्ष दिले म्हणूनच निळवंडे कोपरगाव बंदिस्त पाईप योजनेबरोबरच पाच नंबर साठवण तलावाच्या कामासही बहुमताने मंजुरी दिली होती.
कुठूनही पिण्याचे पाणी येऊ देतं पण
शहराला दररोज स्वच्छ शुद्ध पाणी मिळावे मग ते निळवंडे चे असो की, पाच नंबर साठवण तलावाच्या माध्यमातून असो, यासाठी पालिकेतील आमच्या सत्ताधारी नगरसेवकांनी असो किंवा मी आमदार म्हणून आमची भूमिका तेंव्हा आणि आताही सकारात्मकच राहिली आहे.कोल्हे साहेबांपासुन आज पर्यन्त आमचा कोल्हे परिवार पाणी देणारा आहे पाणी घालवणारा नाही. आयुष्यभर साहेबांचा संघर्ष पाण्यासाठीच होता.
पाच नंबर तलावाचे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत त्यांना पाच नंबरचे काम करू द्या,त्यालाही आमची साथच आहे आम्ही वाट पाहू ! एक मात्र सांगते त्यांनी निळवंडे च्या योजनेत खोडा घातला म्हणून आम्ही त्यात खोडा घालणार नाही. मात्र पाच नंबरचे झाले नाही तर मग निळवंडेच्या योजनेला आम्ही पुन्हा गती देणारच आहोत, निळवंडेच्या पाण्यासाठी त्यांची तयारी असेल तर आपण या तहानलेल्या कोपरगावकरांसाठी निळवंडे योजनेवर त्यांच्याशी बोलण्याची आमची तयारी आहे. असे आवाहन त्यांनी जाहीररित्या यावेळी केले.
चौकट
शहराच्या दररोज किंवा दिवसाआड स्वच्छ पिण्याचे पाणी देण्यामागील वस्तुस्थितीचे सत्य सांगितले जात नाही. प्रत्येक जण सोयीने जलनीती मांडतो. जनता झोपलेली आहे. स्वार्थी लोक जनतेला भूलथापा देऊन फसवतात आणि त्यांच्यावरच राज्य करतात. सातत्याने फसवणूक होऊनही , जनता पेटून उठत नाही. त्याची झळ सातत्याने जनतेला सोसावी लागत आहे; मात्र, जनतेला होत असलेल्या त्रासाचे व्यवस्थेला किंवा शासनकर्त्यांना काहीही सोयरसुतक नाही, याची मोठी खंत वाटते.- एक ज्येष्ठ नागरिक
Post Views:
337





