निवारा केंद्रात श्रीस्वामी समर्थ यांच्या प्रकट दिनानिमित्त भक्तांची मांदियाळी

निवारा केंद्रात श्रीस्वामी समर्थ यांच्या प्रकट दिनानिमित्त भक्तांची मांदियाळी

Mandiyali by devotees on the occasion of Shri Swami Samarth’s apparition day at Nivara Kendra

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Thu 23 March23 ,20.20 Pm By राजेंद्र सालकर

कोपरगाव : श्री स्वामी समर्थ अर्थात अक्कलकोट स्वामी हे १८५६ मध्ये अक्कलकोट इथे अवतरले असे सांगितलं जातं.भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे’ अशा शब्दात भक्तांना विश्वास देणाऱ्या श्री स्वामी समर्थ यांचा प्रकट दिन तिथी प्रमाणे चैत्र शुध्द द्वितीया या दिवशी असतो. यंदाच्या वर्षी ही तिथी गुरुवारी २३ मार्च रोजी आली आहे. विशेष म्हणजे निवारा सुभद्रानगर  केंद्राचा आज १४ वा वर्धापन दिन असून  केंद्राचे  पंधराव्या वर्षात पदार्पण होत आहे.

श्री स्वामी समर्थ यांच्या प्रकट दिन आणि निवारा केंद्राचा १४ वा वर्धापन दिन असा दुग्ध शर्करा योग निमित्त  कोपरगाव निवारा केंद्रात भक्तांची मांदियाळी पाहायला मिळाली. भक्तांच्या इच्छा पूर्ण करत त्यांना आयुष्याच्या मार्गावर मार्गदर्शन करणाऱ्या स्वामींचरणी आज सर्वजण नतमस्तक होत आहेत.
स्वामी समर्थांचे दर्शन घेण्यासाठी मंदिर परिसरात सकाळी  मोठी रांग लागली होती. दैनंदिन काकड आरती संपन्न झाली. त्यानंतर मंदिरात १०.३० वाजता नैवेद्य आरती झाल्यावर स्वामी समर्थ याग कार्यक्रम पार पडला.तर दुपारी १२.३० महेशभाऊ गावंड यांनी भाविकांना मार्गदर्शन केले. नंतर काला प्रसाद भोजनाचा आस्वाद भक्तांनी घेतला. यासाठी महिलांनी प्रत्येक घरातून मटकीची भाजी व चपाती आणली होती काही महिलांनी शिरा, लोणचे, पापड आणले होते.
समर्थांच्या प्रकट दिन व वर्धापनदिनी निवारा सुभद्रानगर परिसरासह शहरातील विविध भागातून भाविक केंद्रामध्ये दाखल झाले होते. आज  वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन मंदिराच्या वतीने करण्यात आले आहे.
 स्वामी समर्थ यांच्या प्रकट दिनानिमित्त सायंकाळच्या आरतीनंतर  मंदिर व परिसर शेकडो हजारो दिव्यांनी उजळून टाकण्यात आला होता.

चौकट

श्री स्वामी महाराजांसमोर श्री यंत्राची भव्य रांगोळी काढण्यात आली होती त्या रांगोळीच्या चोहबाजुने  शेकडो महिला व पुरुष भाविकांचे उपस्थितीत श्री यंत्राच्या रांगोळीवर लहान मुलांचे पावले उमटल्याचे दिसून  आले  या साक्षात्कारामुळे  पावले  बघणाऱ्या उपस्थित शेकडो भाविकांच्या अंगावर अक्षरशः काटा आला.

प्रकट दिन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सचिन वैष्णव, हरिभाऊ गिरमे, अरविंद रूईकर, महेश गावंड सर,  अनिल काळे, महेश गोसावी, संजय लोहारकर बोठरे नाना, काटेताई, थोरातताई, आश्विनी गांवड, गुरसळताई, छाया चौधरी, कुलकर्णीताई, रुपाली आदमाने, श्रीपाद कुलकर्णी, आशिष कुलकर्णी पुजारी,योगेश सारंगधर , डांगे,  सिध्दार्थ पाटणकर, विकी खर्डे, यांनी परिश्रम घेतले.
 

Leave a Reply

You cannot copy content of this page