संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये स्व. शंकरराव कोल्हे यांची जयंती साजरी
In Sanjeevani Group of Institutes. Sankara Rao Kolhe’s birth anniversary celebration
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Fir 23 March24 ,17.40 Pm By राजेंद्र सालकर
कोपरगांवः संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलित कोपरगांव, वैजापुर, शिर्डी , येवला, नवी मुंबई येथिल विविध संस्थांमध्ये संस्थेचे संस्थापक स्व. शंकरराव कोल्हे यांची जयंती निमित्तानं त्यांच्या प्रतिमेचे पुजन करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली.
कोपरगांव येथिल मुख्यालयात भव्य रक्तदान शिबीर घेण्यात आले. या शिबिरात संजीवनी इंजिनिअरींग काॅलेज, संजीवनी के.बी.पी. पाॅलीटेक्निक, फार्मसी, ज्युनिअर व सिनिअर काॅलेज, आदी संस्थांमधिल विद्यार्थ्यांनी मोठा सहभाग नोंदविला. या शिबिरा दरम्यान संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष नितिनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे, विश्वस्त सुमित कोल्हे, संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलित विविध संस्थांचे प्राचार्य यांनी भेटी देवुन रक्तदात्यांची चौकशी केली. संजीवनी ब्लड बॅकेने रक्त संकलित केले.
स्व. कोल्हे यांच्या जयंती निमित्ताने संजीवनी ग्रुप इन्स्टिट्यूट्स मधिल ‘स्टार्ट अप’ उद्योगाने तयार केलेली सौर उर्जेवर चालणारी तीन चाकी सायकल श्रीरामपुर तालुक्यातील खानापुर येथिल ८७ वर्षांचे श्रीधर रामदास आदिक यांच्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली.
संजीवनी सैनिकी स्कूल मध्ये ‘जाणुन घ्या साहेबांना’ या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. वैजापुर येथिल संजीवनी अकॅडमीने नव्याने बांधलेला जलतरण तलाव विध्यार्थ्यांसाठी खुला करण्यात आला.
रक्तदान शिबीरासाठी प्रशासकिय अधिकारी प्रकाश जाधव, कार्यालयीन अधिक्षक नानासाहेब लोंढे व प्रा. गणेश चांगण यांनी विशेष परीश्रम घेतले.