माझ्या रक्ताचा शेवटचा थेंब समाज सेवेसाठी समर्पित – स्नेहलता कोल्हे
Last drop of my blood dedicated to social service – Snehlata Kolhe
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Fir 23 March24 ,16.30 PmBy राजेंद्र सालकर
कोपरगाव : माजी मंत्री शंकरराव कोल्हे नेहमी म्हणत नाळ जोडून ठेवा, होता होईल तो सोन्यासारखी माणसं जपा, शेवटपर्यंत उरलेली जपलेली माणसं यांना अंतर देणार नाही असा शब्द मी दिला माझाही रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत आपण जसं समर्पित आयुष्य जगला समाजसेवेसाठी तसं मी माझं समर्पित आयुष्य व्यतीत करीन अशा ओलावलेल्या भावना माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी एका कार्यक्रमात व्यक्त केल्या.
शुक्रवारी २४ मार्च रोजी सकाळी ११ वाजता संत ज्ञानेश्वर व्यापारी संकुल, छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांच्या ९४ व्या जयंती निमित्त कार्यक्रमात बोलत होत्या.
सौ कोल्हे पुढे म्हणाल्या की, माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांच्या दशक्रिया विधी कार्यक्रमात समाजसेवेसाठी माझं आयुष्य समर्पित करेल असा शब्द दिल्यानंतरच काकस्पर्श झाला हे सर्वांनी बघितलं हा प्रत्येकाच्या श्रद्धा अंधश्रद्धेचा विषय आहे पण मी श्रद्धा मानते काही गोष्टीसाठी साहेबांचा सगळा जीव सामान्य माणसासाठी होता गोरगरीब, दिनदलित, जाती धर्माच्या लोकांना साहेबांनी आपलं आपला परिवार मानला साहेब हे चार चौघासारखे आमच्या परिवारापुरते नव्हते तर ते लोकनेते होते. म्हणून त्यांच्या प्रतिकृतज्ञता व्यक्त करताना त्यांचे संस्कार व विचारांनी प्रेरित होऊन त्यांच्या ९४ व्या जयंतीनिमित्त समाजसेवेचा उपक्रम करून छोट्या-मोठ्या कार्यकर्त्यांनी त्यांचे स्मरण ठेवले आहे या सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करते. साहेबांच्या हेच विचार व संस्कार सोबत घेऊन समाजासोबत राहूया असा संकल्प यावेळी त्यांनी केला
यावेळी सरला दीदी म्हणाल्या, अध्यात्मिक नियमानुसार माजी मंत्री शंकरराव कोल्हे जरी साकार रुपातून आपल्यातून गेले असले तरी अव्यक्त रूपाने आजही ते जबाबदारी उचलत आहे. कोपरगाव तालुक्या साठी नव्हे तर संपूर्ण भारतासाठी त्यांची संकल्पना होती. साहेब हे सेवेशिवाय राहू शकत नाही कारण त्यांच्या संस्कारात सेवा सेवा आणि सेवाच सामावलेली आहे जी माणसं आपलं आयुष्य समाजासाठी व्यतीत करतात ती माणसे गेल्यानंतरही अदृश्य रुपाने समाजासाठीच काम करत असतात अशा भावना व्यक्त केल्या.
कोपरगाव अमरधाम येथे संजीवनी उद्योग समूह व अष्टविनायक मित्र मंडळ यांच्या माध्यमातून प्रवचनकार बैठक कक्ष,विसावा ओटा,अस्थीकलश ठेवण्याचे कपाट वैकुंठ रथ याचे लोकार्पण मा.आ.सौ.स्नेहलता कोल्हे व प्रजापिता ब्रम्हकुमारी कोपरगाव केंद्राच्या प.पूज्य सरलादीदी यांच्या हस्ते विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
प्रसंगी दिलीप दारुणकर, बाळासाहेब नरोडे, शरदना थोरात, पराग संधान, दत्तात्रय काले, रवींद्र पाठक, राजेंद्र सोनवणे ,योगेश बागुल ,अतुल शेठ काले, विजय आढाव, उद्धव विसपुते,जितेंद्र रणशूर, बबलू वाणी, विनोद राक्षे, अशोक लकारे, संजय जगदाळे, गणेश आढाव, संदीप देवकर ,उल्हास बापू पवार , कैलास जाधव ,राजेंद्र बागुल, सौ.वैशाली आढाव, सौ. विद्या सोनवणे, सौ. शोभा पवार, सौ. विजया देवकर, सौ.सुवर्णा सोनवणे, विजय वाजे, स्वप्नील निखाडे, जनार्दन कदम, अल्ताफ कुरेशी, दिनेश कांबळे ,अविनाश पाठक, वैभव आढाव ,रवींद्र रोहमारे, गोपीनाथ गायकवाड ,राजेंद्र लोखंडे , नरेंद्र डंबिर ,राहुल सूर्यवंशी ,मनील नरोडे ,विनोद गलांडे ,खालिक कुरेशी, जगदीश मोरे ,विक्रमादित्य सातभाई, प्रसाद आढाव, पप्पू पडियार, रंजन जाधव,सतीश रानोडे,हशम पटेल,महेश खडमकर, किरण सुपेकर, विष्णुपंत गायकवाड,दादा नाईकवाडे,रवींद्र सोमासे, जयेश बडवे,दीपक जपे, भानुदास कुहिले, संतोष नेरे ,अनिल गोडसे, बंटी पांडे, सलीम पठाण,सद्दाम भाई सय्यद,अहमद बेकरीवाले,आबा नरोडे, संतोष साबळे, रोहित आढाव, विजय चव्हाणके, सुशांत खैरे, सचिन सावंत,सागर जाधव,गोपी सोनवणे, संदीप ढोमसे, मुकुंद उदावंत,शंकर बिऱ्हाडे, फकीरमहम्मद पैलवान,रहीम शेख,राजेंद्र गंगुले, सोमनाथ मस्के, अभिजीत मंडलिक, गोपीनाथ चव्हाण, हेमंत चव्हाण,बाळासाहेब राऊत, बाळासाहेब मंडलिक, स्वप्निल कडू, मुसा मुलानी, समीर सुपेकर,काका पुरंदरे, बाळासाहेब राक्षे, मुख्तार शेख, नंदू वायडे, नरेंद्र जाधव, आशिष उदावंत,मुख्तार शेख आदिंसह भाजपा,शिवसेना मित्रपक्षांसह विविध संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post Views:
333