कांदा चाळीतून २० हजाराच्या सोयाबीनची चोरी;३चोरट्यांना अटक

कांदा चाळीतून २० हजाराच्या सोयाबीनची चोरी;३चोरट्यांना अटक

Theft of 20,000 soybeans from onion chali; 3 thieves arrested

तीन दिवसाची पोलीस कोठडी; एक  लाख ३६ हजाराचा मुद्देमाल जप्त Three days police custody; 1 lakh 36 thousand seized

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Sat 25 March24 ,20.00 Pm By राजेंद्र सालकर
 

कोपरगाव :  तालुक्यातील घरफोडी, कृषी पंप चोरी, केबल चोरी तसेच कृषी साहित्याची  चोऱ्यांच्या घटना सुरू असतानाच   ब्राह्मणगाव येथील कांद्याच्या चाळीमधून ४ क्विंटल सोयाबीन व ५० किलो गहू  असा सुमारे २१ हजार रुपये किमतीचा शेतमाल चोरी झाल्याने शेतकरी वर्गात असुरक्षिततेचे वातावरण असल्याची भावना निर्माण झाली आहे. 

ब्राम्हणगांव शिवारातील शेतकरी रमेश भिकाजी आंबिलवादे (५०) याचे का्ंद्याचे चाळीतून २० हजार रुपये किंमतीचे चार क्विटंल सोयाबीन व १२००  रुपये किंमतीचे ५० किलो गव्हाची गोणी २२ मार्च रोजी चोरीस गेली यासंदर्भात कोपरगाव ग्रामीण पोलीसांकडे गुन्हा दाखल होताच तपासाची चक्रे फिरु लागली.
  यापूर्वी शेतातून कांदे काढून नेणे, भरलेल्या पिशव्या उचलून नेणे, डाळिंबाच्या बागेतून डाळींब तोडून नेणे, असे प्रकार घडलेले आहेत. परंतु आता  कांदे चाळीतून थेट सोयाबीनच  चोरून नेल्याने   शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
पोलीसांना गुप्त माहिती मिळाली की, संशयीत आरोपी हे ब्राम्हणगांव येथे फिरत आहे.  पोलीस निरिक्षक वासुदेव देसले स.फौ.ए. एम. आंधळे, पो. कॉ. रशीद शेख पो कॉ के. बी. सानप व चालक पो. ना. साळुंके यांनी घटनास्थळी जावून संशयीत आरोपी नामे संतोष भास्कर पवार (३२) शंकर नामदेव माळी  (२८), राहुल आप्पा ठाकरे (२५)  सर्व रा. ब्राम्हणगांव हे मिळून आले. या आरोपींना पोलीसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्हयाची कबुली दिली. पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली शेतीमालासह आरोपी कडील तीन मोटरसायकली असा एकूण एक लाख ३६ हजार २०० रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. या आरोपींना कोपरगांव येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांचेपुढे उभे केले असतां सोमवार २७ मार्च पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. 
आधीच अवकाळी पावसाचा तडाखा, त्यातून पालेभाजी, पिकांचे झालेले नुकसान, शेतमालाचे पडलेले बाजारभाव, सातत्याने असलेली बिबट्यांची दहशत या समस्यांनी हैराण झालेला शेतकरी अनेक संकटांशी सामना करीत उभारी घेत असतानाच त्यांच्या कष्टावरच डल्ला मारला जात असल्याने हताश झाल्याचे आंबीलवादे यांनी सांगितले. पोलिसांनी शेतीमालासह आरोपींना तातडीने पकडल्याबद्दल  त्यांनी समाधान व्यक्त केले 

Leave a Reply

You cannot copy content of this page