मुंबादेवीच्या साईगाव पालखी सोहळ्यामुळे साई सेवेची संधी – आ.आशुतोष काळे       

मुंबादेवीच्या साईगाव पालखी सोहळ्यामुळे साई सेवेची संधी – आ.आशुतोष काळे

     Opportunity for Sai Seva due to Saigaon Palkhi Ceremony of Mumbadevi – A. Ashutosh Kale

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Tue 28 March24 ,18.10 Pm By राजेंद्र सालकर

कोपरगाव :  गेल्या तीन दशकांपासून मुंबादेवी तरुण मंडळाने साई गाव पालखीच्या माध्यमातून विविध प्रकारच्या कथा श्रावणातून श्रवणाबरोबर रामनवमीनिमित्त कोपरगाव शिर्डी पदयात्रा या माध्यमातून कोपरगावकरांना साई सेवेची संधी उपलब्ध करून दिली असल्याचे गौरवउद्गार आमदार आशुतोष काळे यांनी व्यक्त केले

सोमवारी (२७) रोजी  श्रीरामनवमी निमित्त मुंबादेवी तरुण मंडळाच्या श्री साईगाव पालखी सोहळा,  आयोजित ‘आदिशक्ती महात्म्य कथा’ या कार्यक्रमाच्या व्यासपीठावरून ते बोलत होते 
 आ आशुतोष काळे म्हणाले मागील साडे तीन वर्षात वचनपूर्ती करताना  १२०० कोटीपेक्षा जास्त निधी आणून कोपरगाव मतदार संघातील रस्ते, पाणी, वीज, आरोग्य आदी विकासाचे मुलभूत प्रश्न मार्गी लावले आहेत कोपरगाव शहराचा अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न लावण्यासाठी ५ नंबर साठवण तलावाचे काम प्रगतीपथावर असून लवकरात लवकर  शहरातील नागरिकांना नियमित स्वच्छ व शुद्ध पाणी देण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.  शहराच्या विकासासाठी देखील कोट्यावधी रुपयांचा निधी शहरातील रस्ते, सुशोभिकरण, अमरधाम, समाजमंदिरासाठी दिला असून विकासाचे शिल्लक प्रश्न देखील लवकरच मार्गी लावणार असल्याची ग्वाही  आ. आशुतोष काळे यांनी दिली
यावेळी साईगाव पालखी व मुंबादेवी तरुण मंडळाचे   सुनील फंड, संजय जगताप, संतोष चव्हाण, राहुल देवळालीकर, मनोज कपोते, रिंकेश खडांगळे,  धरमचंद बागरेचा, मंदार पहाडे, रमेश गवळी, राजेंद्र वाकचौरे,  सुनील शिलेदार,  नवाज कुरेशी, डॉ. तुषार गलांडे, चंद्रशेखर म्हस्के, सुनील बोरा, बाळासाहेब रुईकर, राजेंद्र खैरनार, महेश उदावंत, शैलेश साबळे, रितेश राऊत, लक्ष्मण सताळे, गणेश बोरुडे, आकाश गायकवाड, दादा हलवाई, विकी जोशी, मच्छिन्द्र तांबोळी, बाबा देवकर, ओम कपोते, समर्थ दिक्षित, प्रदीप मते, पप्पु गंगवाल, निखील लोंढे, अरविंद मंडलिक, संदीप दळवी, विजय उदावंत, गोपाल वैरागळ, राहुल पांडे, अक्षय खडांगळे, राजेंद्र माळी, विशाल उदावंत, विवेक फंड, मयूर दळवी, मयूर म्हसे, आनंद मोरजकर, रोहित जाधव, वैभव जोशी, संदीप दळवी, राजेंद्रजी खडांगळे, अश्विन टिळेकर, सिद्धार्थ मोटे आदिसह कार्यकर्ते पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते आदींसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते

Leave a Reply

You cannot copy content of this page