सौ. सुशीलामाई काळे महाविद्यालयात शुक्रवारी बहुविद्याशाखीय शिक्षण राष्ट्रीय कार्यशाळा
Mrs. Multidisciplinary Education National Workshop on Friday at Sushilamai Kale College
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Tue 28 March24 ,19.30 Pm By राजेंद्र सालकर
कोपरगाव : गुणवत्ता हमी कक्ष विभागाअंतर्गत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण- २०२० अंमलबजावणी: बहुविद्याशाखीय शिक्षण’ याविषयावरील राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन सचिव चैताली काळे यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी ३१ मार्च रोजी कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या सौ. सुशीलामाई काळे महाविद्यालयात करण्यात आले असल्याची माहिती प्राचार्या डॉ.सौ. विजया गुरसळ यांनी दिली आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे वाणिज्य आणि व्यवस्थापन विभागाचे अधिष्ठाता डॉ.पराग काळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच संस्थेचे चेअरमन माजी आमदार अशोक काळे यांच्या अध्यक्षतेखाली व संस्थेचे विश्वस्त आ.आशुतोष काळे यांच्या उपस्थितीत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेसाठी कर्नाटक येथील डॉ.मल्लाप्पा कोंढनापूर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील भूगोल विभागाच्या अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ.गणेश चव्हाण व वाणिज्य शाखेतील कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटिंग अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. संतोष पगारे हे उपस्थित राहणार आहेत. या राष्ट्रीय कार्यशाळेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन प्राचार्या गुरसळ यांनी केले आहे. सदर कार्यशाळेचे कामकाज समन्वयक प्रा.विनोद मैंद, प्रा.पांडुरंग मोरे हे करत आहेत