माणसात प्रामाणिकपणाविना इतर गुण शून्य – राजेश टोपे
Without honesty in a man other qualities are zero – Rajesh Tope
संजीवनी इंटरनॅशनल स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसम्मेलन व पारितोषिक वितरणAnnual convocation and prize distribution at Sanjeevani International School
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published onWed 29 March24 ,20.30 Pm By राजेंद्र सालकर
कोपरगांव: संस्कारक्षम पिढी घडविणे, हे शिक्षणाचे मुख्य ध्येय असावे,मनुष्याला यशस्वी होण्यासाठी त्याच्यातील हुशारी, कष्ट करण्याची तयारी व स्वभावात प्रामाणिकपणा असे तीन गुण महत्वाचे असतात. पण जर प्रामाणिकपणा नसेल तर इतर गुणांची किंमत शून्य होते असे परखड विचार माजी मंत्री राजेश टोपे यांनी शिर्डी येथे संजीवनी इंटरनॅशनल स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनात पारितोषिक वितरण प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना केले प्रामाणिक विद्यार्थ्यांना भविष्यातील कोणतही वादळ वार विचारत करू शकणार नाही असेही ते म्हणाले
यावेळी कोपरगांवच्या प्रथम महिला आमदार सौ. स्नेहलता कोल्हे, सौ. कलावती कोल्हे, संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे, स्कूलच्या संचालिका डॉ. मनाली कोल्हे, प्राचार्या सौ. सुधा सुब्रमण्यम उपस्थित होते. पालक आणि विध्यार्थ्यांचे नातेवाईकही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रारंभी सुब्रमण्यम यांनी सर्वांचे स्वागत केले. त्यानंतर टोपे यांचे हस्ते विविध क्षेत्रात विध्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाबध्दल पारितोषिके देवुन गौरविण्यात आले.
यावेळी डॉ. मनाली कोल्हे यांनी राज्य व देश पातळीवर विध्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात अनेक पदकांची कमाई केल्याचे सांगीतले. तसेच विध्यार्थ्यांच्या आवडीनुसार त्यांना आधुनिक ज्ञान देण्यासाठी तज्ञ व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली मिनी एमबीए, यंग सॉफ्टवेअर, रोबाटिक्स, कोडींग आणि फॅशन डीझाईनचे अभ्यासक्रम विनामुल्य शिकविले जाणार असल्याचे जाहिर केले.
श्री टोपे पुढे म्हणाले की माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी ग्रामिण भागातील विध्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळाले पाहीजे यासाठी अनेक शिक्षण संस्था काढुन मोठे कार्य केले. त्यांनी हाती घेतलेले कार्य कोल्हे कुटूंबिय नेटाने पुढे नेत आहे. येथिल विध्यार्थ्यांनी सादर केलेले कला अविष्कार , येथिल विध्यार्थ्यांसाठीच्या आधुनिक सोयी सुविधा या सर्व विध्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासाच्या साक्ष देतात. पालकांनी आपले स्वप्न मुलांवर लादु नये तर त्यांची आवड ओळखुन त्यांना विकसीत करावे. विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच खेळ आणि अवांतर वाचन करून शरीरयष्टीबरोबर ज्ञानही कमवावे सुदृढ शरीरात खंबीर व सुदृढ मन असते असेही ते शेवटी म्हणाले
सौ. स्नेहलता कोल्हे म्हणाल्या की संजीवनी शैक्षणिक समुहाने उत्तम शैक्षणिक दर्जा राखल्याने आज संजीवनीचे माजी विध्यार्थी संपुर्ण जगात मोठ्या पदांवर कार्यरत आहे. श्री टोपे यांनी कोविड काळात उत्कृष्ट परीस्थिती हाताळली, याबध्दल त्यांनी त्यांच्याबध्दल गौरवोद्गार काढले.
या वर्षी सांस्कृतिक कार्यक्रमासाठी ‘नृत्य’ या संकल्पनेवर विविध राज्यातील पारंपारीक नृत्ये सादर केली. भव्य रंगमंच, उत्कृष्ट बैठक व ध्वनी व्यवस्था, प्रत्येक नृत्यानुसार असलेली भव्य प्रकाश व्यवस्था, एका तालात अभिनयासहित विध्यार्थ्यांनी सादर केलेली नृत्ये व त्यांनीच अस्खलित इंग्रतीमध्ये केले सुत्रसंचलन आणि रसिक प्रेक्षकांची भरभरून मिळणारी दाद, इत्यादी बाबी सर्वांचेच लक्ष वेधुन घेणाऱ्या ठरल्या.

Post Views:
337