कौशल्याधिष्ठित अभ्यास  ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी  पदवी व  उपजीविकेचे साधन  -डॉ. पराग काळकर

कौशल्याधिष्ठित अभ्यास  ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी  पदवी व  उपजीविकेचे साधन  -डॉ. पराग काळकर

Skilled Studies Degree and Livelihood Tool for Rural Students -Dr. Parag Kalkar

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Sat 1 April23 ,19.00 Pm By राजेंद्र सालकर

कोपरगाव : नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची सुरुवात महाराष्ट्रात तब्बल तीन वर्षे उशिराने झाली या शैक्षणिक धोरणांची माहिती घेऊन ग्रामीण भागातील शैक्षणिक संस्थांनी कौशल्य आधारित अभ्यासक्रम तयार करावेत. ही काळाची गरज आहे त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे  उच्च शिक्षणातील गळतीचे प्रमाण कमी होऊन येथेच पदवीबरोबरच उपजीविकचे साधन  निर्माण होईल असा विश्वास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील वाणिज्य व व्यवस्थापन विभागाचे अधिष्ठाता डॉ. पराग काळकर यांनी म्हटले आहे.

कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथील सौ. सुशीलामाई काळे महाविद्यालयातील “२०२० राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी-बहुविद्याशाखीय शिक्षण ” या विषयावर राष्ट्रीय कार्यशाळेत ते बोलत होते 

 डॉ. पराग काळकरकर्नाटक येथील प्राध्यापक डॉ. मल्लाप्पा कोंढणापूर, संस्थेचे विश्वस्त आ.आशुतोष काळेसचिव सौ. चैताली काळे,गव्हर्निंग कौन्सिल सदस्य, बाळासाहेब बारहाते उपस्थित  होते.

 यावेळी सौ. चैताली काळे म्हणाल्या की, परिसरातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी   शहरी सोयी सुविधासह कर्मवीर शंकरराव काळे यांनी कोळपेवाडी येथे महाविद्यालय सुरू केले. दोन वर्ष कोरोनामुळे ऑनलाइन शिक्षण घ्यावे लागले  विद्यार्थी सोशल मीडियावर जास्त रमला व शैक्षणिक गुणवत्ता  खालावली आहे. त्यामुळे ऑनलाईनपेक्षा  आता ऑफ लाईन शिक्षणावर भर देणे गरजेचे असून त्या दृष्टीने महाविद्यालय प्रयत्न करीत असल्याचे सांगितले.

डॉ. मल्लाप्पा कोंढनापुर यांनी कर्नाटक राज्यात नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करतांना आलेल्या अडचणी नमूद केल्या. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील भूगोल विभागाच्या अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. गणेश चव्हाण व वाणिज्य विभागातील कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटिंग या अभ्यास मंडळाचे सदस्य डॉक्टर संतोष पगारे यांनी नवीन शैक्षणिक धोरण बदल व अंमलबजावणी करताना येणाऱ्या समस्या याबाबत विस्तृतपणे कार्यशाळेत चर्चा केली. 

कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी आष्टी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सोपान निंबोरे यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करतांना विद्यार्थ्यांचे डिजिटल क्रेडिट कसे नोंदविले जातील याबाबतची माहिती दिली.या राष्ट्रीय कार्यशाळेत मोठ्या संख्येने प्राध्यापक सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले प्राचार्या डॉ. सौ विजया गुरसळ यांनी केले.कार्यशाळेचे कामकाज समन्वयक प्रा.विनोद मैंद व प्रा. पांडुरंग मोरे यांनी पाहिले.

Leave a Reply

You cannot copy content of this page