धोंडेवाडीत आदर्श महिला बचत गटाचे स्वस्त धान्य दुकान सुरू
Adarsh women’s self-help group’s cheap grain shop started in Dhondewadi
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Sat1 April23 ,19.10 Pm
By राजेंद्र सालकर
कोपरगाव : माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या विशेष प्रयत्नातून कोपरगाव तालुक्यातील धोंडेवाडी येथील आदर्श महिला स्वयंसहाय्यता बचत गटाचे नवीन सरकारमान्य स्वस्त धान्य दुकान सुरू करण्यात आले
यावेळी स्नेहलता कोल्हे म्हणाल्या, केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार आणि महाराष्ट्रातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारच्या वतीने महिलांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबविल्या जात आहेत. महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने सरकार वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून ठोस काम करत आहे.राज्याच्या सर्वांगीण विकासाला गती मिळाली आहे. कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील विकासाचे विविध प्रश्न या सरकारने मार्गी लावले आहेत. राहिलेले प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत, ग्वाही त्यांनी यावेळी दिली
स्नेहलता कोल्हे यांनी संजीवनी महिला स्वयंसहाय्यता बचत गटाच्या माध्यमातून महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्याबरोबरच आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्याचे काम केले आहे या स्वस्त धान्य दुकानामुळे गावकऱ्यांना शासकीय दरात धान्य उपलब्ध होणार आहे. याचा गरजू नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन स्नेहलता कोल्हे यांनी केले.
याप्रसंगी आदर्श महिला बचत गटाच्या अध्यक्ष सौ. मंगल बाबासाहेब नेहे, सचिव सौ. मीना प्रभाकर नेहे, उपसरपंच सौ. रोहिणी राजेंद्र नेहे, निवृत्ती दरेकर, वाल्मिक नेहे, एकनाथ दरेकर, प्रभाकर नेहे, बाबासाहेब नेहे, गणेश नेहे, कैलास रहाणे, बंडोपंत थोरात, अण्णासाहेब भोसले, ज्ञानदेव थोरात, भाजयुमोचे तालुकाध्यक्ष विक्रम पाचोरे, नवनाथ भडांगे, भाऊसाहेब भडांगे, राजेंद्र कोल्हे, रामदास भडांगे, नाना काकडे, बाळासाहेब काकडे, गोरक्षनाथ दरेकर, संजय थोरात, शांताराम नेहे, सीताराम काकडे, राजेंद्र टिळेकर, ग्रामसेवक, शांताराम दरेकर, भानुदास काकडे, अशोक थेटे यांच्यासह महिला बचत गटाच्या पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
Post Views:
113