प्रत्येक शाखेत ६५ कोटींच्या ठेवी हा समता पतसंस्थेचा महाराष्ट्रात विक्रम – संदीप कोयटे

प्रत्येक शाखेत ६५ कोटींच्या ठेवी हा समता पतसंस्थेचा महाराष्ट्रात विक्रम – संदीप कोयटे

65 crore deposits in each branch is a record of Samata Credit Institution in Maharashtra – Sandeep Koyte

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Sat1 April23 ,19.20 Pm
By राजेंद्र सालकर

कोपरगाव:  समताच्या ठेवी ३१ मार्च २०२२  रोजी ६६१ कोटी इतक्या होत्या त्यात २०% इतकी वाढ होऊन ३१ मार्च २०२३ अखेर ७९२.५१ कोटी रुपयांच्या झाल्या असून कर्ज वाटप ५५८ कोटी रुपये केले आहे.’समताच्या प्रति शाखा ६५  कोटींच्या ठेवी हा महाराष्ट्रात विक्रम झाल्याची माहिती संचालक संदीप कोयटे यांनी दिली

संदीप कोयटे म्हणाले की पतसंस्थेने ३१ मार्च २०२३  रोजी १३५० कोटी रुपयांचा संमिश्र व्यवसाय पूर्ण केला असून ठेवींमध्ये तब्बल १३१ कोटी रुपयांची वाढ होऊन एकूण ठेवी ७९२.५१ कोटी रुपये एवढ्या झाल्या आहे.
तसेच कर्ज वाटपामध्ये ३१.८५ कोटी रुपयांची वाढ होऊन संस्थेचे एकूण कर्ज वाटप ५५८ कोटी एवढे झाले असून संस्थेची गुंतवणुक २७५ कोटी एवढी आहे.५ कोटी ७१ लाख इतका ढोबळ नफा झालेला आहे. 
सहकार क्षेत्रात अग्रेसर असलेल्या येथील समता पतसंस्थेने सन २०२२-२०२३ चा आर्थिक अहवाल सालात या वर्षीही प्रसिद्ध करून ३१ मार्चला अहवाल प्रसिद्ध करण्याची परंपरा कायम ठेवली आहे. 
तसेच पतसंस्थेने वसुली बाबतही आघाडी कायम राखली असून संस्थेच्या शाखांपैकी वैजापूर, राहुरी, राहाता, पुणे, गांधी चौक  या शाखांनी ० % एन.पी.ए. राखण्यात यश मिळविले आहे. तर शिर्डी, नाशिक, येवला  यांनी २ % एन.पी.ए. राखला आहे. इतर शाखा अल्प एन.पी.ए.राखण्यात यशस्वी झाल्या आहेत. 
याबाबत अधिक बोलताना ते म्हणाले , ‘ समताने ठेव वाढ, कर्ज वाढ व गुंतवणूक यामध्ये विविध विक्रम प्रस्थापित केले आहे. विशेषतः बँकिंग क्षेत्रातील कर्ज वाटपापैकी अत्यंत सुरक्षित समजले जाणारे सोनेतारण कर्ज हे जगात सर्वात सुरक्षित समजले जाणारे कर्ज आहे, समताचे सोनेतारण कर्ज ३१ मार्च २०२२ अखेर १७१ कोटी रुपये इतके होते, त्यात तब्बल ६६ कोटी रुपयांची वाढ होऊन ते आता २३७ कोटी रुपयांपर्यंत  पोहोचले आहे. सोने तारण कर्जामध्ये अद्ययावत तंत्रज्ञानाचा अवलंब करून ० % रिस्क सोनेतारण कर्जात आणण्यात यश मिळविले आहे.सहकार खात्याच्या नियमानुसार ७० % इतका अपेक्षित आहे तो संस्थेने ७० % इतकाच राखलेला आहे.
त्याचबरोबर सोनेतारण कर्ज वितरण सुरक्षित होण्यासाठी देखील विविध अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केल्याने महाराष्ट्रातील पतसंस्थात सोने तारण कर्ज वाटपात समताचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत असतात. त्यामुळे संस्थेचे कामकाज बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात भेट देत असतात.’ 
समता पतसंस्थेची सभासद संख्या ३१ मार्च  पर्यंत तब्बल ९०,२४४ इतकी झाली आहे.समता पतसंस्थेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हे सर्व व्यवहार केवळ १३ शाखांच्या माध्यमातून झालेले आहे. प्रति शाखा ठेवींचा विचार केल्यास प्रति शाखा सरासरी ६५ कोटी रुपये पर्यंत ठेवींचा आकडा जात आहे. हा महाराष्ट्रातील सहकारी पतसंस्था चळवळीतील विक्रम आहे. 
सोने तारण कर्जाचे प्रमाण एकूण कर्जाच्या प्रमाणात ४२% इतके आहे. संस्थेची सुरक्षित गुंतवणूक आणि सोनेतारणासारखे अति सुरक्षित कर्ज याचे एकूण ठेवींशी प्रमाण ६४.६०% इतके आहे.त्यामुळे सुरक्षित गुंतवणूक व कधीही वसूल होऊ शकणारे सोनेतारण कर्ज या आधारावर समताच्या ९९.६९ % ठेवीदारांच्या २५ लाख रुपयांच्या ठेवी सुरक्षित आहे. तसेच उर्वरित २५० कोटी रुपयांचा ठेवीसाठी २९४ कोटी इतक्या रुपयांचे सुरक्षित कर्ज वाटप केले आहे.                          वरील सर्व आर्थिक परिस्थितीचा विचार करता समता पतसंस्था ही महाराष्ट्रातील सर्वात सुरक्षित नागरी सहकारी पतसंस्था म्हणून गणली जाते.
समताने केवळ कर्ज वाटप न करता मायक्रो फायनान्सने  दिलेल्या महिला बचत गटाने उत्पादित केलेल्या मालास, स्वदेशी उत्पादनास भारतभर ऑनलाईन विक्री करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनने सहकार उद्यमीच्या माध्यमातून ‘सहकार उद्योग मंदिर व समता सहकार मिनी मॉल’ अंतर्गत स्थानिक तसेच स्वदेशी उत्पादने उपलब्ध करून दिली आहे. समता महिला बचत गटाद्वारा ‘समता सहकार मिनी मॉल’ सुरु करून कोपरगाव तालुक्यातील बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या मालाला हक्काची बाजारपेठ व विक्री केंद्र उपलब्ध करून दिली असल्याची माहिती समता नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक संदीप कोयटे यांनी दिली.                                            
समताने अत्याधुनिक तंत्रज्ञान प्रणालीमध्ये देखील केवळ समता पतसंस्थामध्ये नव्हे, तर बँकिंग क्षेत्रामध्ये क्रांती केलेली आहे. मोबाईल बँकिंग, ऑनलाइन बँकिंग, त्याचबरोबर व्हाऊचरलेस बँकिंग प्रणाली पतसंस्था चळवळीमध्ये सर्व प्रथम आणून पेपरलेस बँकिंग प्रणाली प्रत्यक्षात आणली आहे. समताने पतसंस्था चळवळ देखील बँकांपेक्षा कमी नाही हे दाखवुन दिल्याचे संस्थेचे जेष्ठ संचालक जितेंद्र शहा यांनी सांगितले.
‘कर्ज वितरण करताना देखील समता पतसंस्था महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनने विकसित केलेली सिबिल सारखी क्रास प्रणालीचा वापर केल्याशिवाय कर्ज पुरवठा करत नाही. नेटविन इंडिया सॉफ्टवेअर कंपनीने विकसित केलेली शुअर सेल, शुअर पेमेंट या प्रणाली मार्फत देखील छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.’ असे समताचे सर व्यवस्थापक सचिन भट्टड म्हणाले.
*चौकट*
सामाजिक क्षेत्रात तर समता परिवार नेहमीच अग्रभागी असतो. कोरोना काळात अल्पावधीत समता परिवाराने दररोज ९०० गरजूंना घरपोहोच जेवणाचे डबे पुरविले होते.कोरोना संपला तरीही ६० गरजू , निराधार कोपरगावकरांना घर पोहोच भोजनाचे डबे पाठविण्याचा उपक्रम अद्यापही सुरु आहे.
यावेळी समता पतसंस्थेचे अध्यक्ष ओमप्रकाश तथा काका कोयटे, ज्येष्ठ संचालक गुलाबचंद अग्रवाल, जितेंद्र शहा, चांगदेव शिरोडे, कचरू मोकळ आदींसह मुख्य कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

You cannot copy content of this page