साईबाबाबद्दल,बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांचं वादग्रस्त वक्तव्य निषेधार्थ – सौ स्नेहलता कोल्हे 

साईबाबाबद्दल,बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांचं वादग्रस्त वक्तव्य निषेधार्थ – सौ स्नेहलता कोल्हे 

Controversial statement of Dhirendra Shastri of Bageshwar Dham about Sai Baba – Mrs. Snehalata Kolhe

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Sun2 April23 ,19.00 Pm
By राजेंद्र सालकर

कोपरगाव : एका मागे एक महाराष्ट्रातील संत व श्रद्धास्थानाबद्दल  नेहमी काही ना काही  मुक्ताफळे  उधळून  चर्चेत राहणारे बागेश्वर धामचे  महंत पंडित धीरेंद्र शास्त्री यांनी पुन्हा एकदा जबलपूरमध्ये शिर्डीच्या साईबाबांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा  माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी शब्दात निषेध केला. संत असो की स्वातंत्र्य सेनानी यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांचा  चांगलाच समाचार घेतला .

सौ स्नेहलता कोल्हे म्हणाल्या,  रुग्णसेवेतून मानवता धर्माची शिकवण देणाऱ्या साईबाबांनी शंभर वर्षांपूर्वी श्रद्धा आणि सबुरी हा मंत्र दिला आज जगाला याच श्रद्धा आणि सबुरी ची गरज आहे.  साईबाबांना नावं ठेवणारी अनेक लोकं आजपर्यंत आली गेली, मात्र आज जगात बाबांची अनेक मंदिरे आहेत कोट्यावधी भाविक  बाबांच्या शिकवणुकीप्रमाणे चालतात. धीरेंद्र शास्त्रींनी महाराष्ट्राची संत परंपरा समजून घ्यावी.एका विशिष्ट विचारसरणीचे लोक सवंग लोकप्रियेतेच्या हवासापोटी  संतांच्या व मोठ्या लोकांच्या नावांचा वापर करतात.  समाजात वाद वाढवणाऱ्या या विकृतीला वारेमाप प्रसिद्धी मिळते .  
नको त्या गोष्ठीचे राजकरण चालले आहे.  राजकीय पक्षाच्या  बाष्कळ  बडबड करणाऱ्यांनाही सुद्धा  आता आवर घालण्याची गरज निर्माण झाली आहे  
सौ कोल्हे म्हणाल्या, समाजात अशी लोक बाबा बुवाचे रूप घेउन , लोकांचा बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न करतात. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामध्ये जो फरक आहे त्याचप्रमाणे धर्माभिमान  व धर्मांधता  यातही   गल्लत होते. धर्मांधतेचा अतिरेकीपणा  घातक आहे. अशा विधानातून ते धार्मिक तेढ निर्माण करून समाजमध्ये अशांतता  व  दरी निर्माण करत आहेत. लाखो भाविकांचे श्रद्धा स्थान असलेल्या साईबाबांवर अशा प्रकारे  भडक वक्तव्य करून स्वतःची प्रसिद्धी  मिळविणाऱ्यांना प्रसार माध्यमांनी किती स्थान द्यायचे याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे त्याचप्रमाणे  अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली मुक्ताफळे उधळून  भडक   वक्तव्य करणाऱ्या  या वाचाळवीरांना  प्रसिद्धी माध्यमाने किती स्थान द्यायचे याचा विचार केला पाहिजे. 
  सौ कोल्हे म्हणाल्या की कोणीही उठतो आणि  प्रसिद्धीसाठी स्वातंत्र्यसेनानी बद्दल काहीही  बोलतो कोणी जहाल मतवादी असेल  तर कोणी  मवाळ मतवादी असेल पण त्यांचे त्या काळात स्वातंत्र्यासाठी दिलेले योगदान कमी होत नाही. देशापुढे अनेक प्रश्न असताना स्वातंत्र्य सेनानींच्या योगदानावर प्रश्नचिन्ह निर्माण करून  राजकीय चर्चा करणे सुद्धा निषेधार्थ आहे  अशा  वक्तव्यांना किती महत्त्व द्यायचे व त्यावर किती चर्चा करायची याचा राजकारण्यांनी सुद्धा गांभीर्याने विचार केला पाहिजे अशा बाष्कळ चर्चेमुळे  हिंदुस्थानची प्रतिमा  जगापुढे वेगळी जायला नको असेही त्या शेवटी म्हणाल्या 

Leave a Reply

You cannot copy content of this page