कोपरगावच्या कन्या दर्शना पवार व प्रियंका जाधव यांचे यश कौतुकास्पद -स्नेहलता कोल्हे
Kopargaon girls Darshana Pawar and Priyanka Jadhav’s success commendable – Snehalta Kolhe
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Sun2 April23 ,19.10 Pm
By राजेंद्र सालकर
कोपरगाव : कोपरगाव येथील कु. दर्शना दत्तू पवार व कु. प्रियंका कैलासराव जाधव दोन्ही मुलींनी मिळवलेले हे यश कोपरगाव तालुक्यासाठी निश्चितच अभिमानास्पद असल्याचे प्रतिपादन माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी त्यांच्या सत्कार प्रसंगी केले.
आरएफओ पदाच्या परीक्षेत राज्यात सातव्या येणाऱ्या कोपरगावच्या दर्शना पवार हिची ‘परिक्षेत्र वन अधिकारी’ म्हणून नियुक्ती झाली आहे. तर शहरातील लक्ष्मीनगर येथील प्रियंका कैलासराव जाधव हीची जलसंपदा विभागात ‘कनिष्ठ अभियंता’ (ज्युनियर इंजिनीअर)’ या पदावर नियुक्ती झाली आहे.
प्रियंका जाधव हिने कोपरगाव येथील संजीवनी इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये सिव्हील इंजिनीअरिंग शाखेत शिक्षण पूर्ण केले असून, सध्या छत्रपती संभाजीनगर येथे एम. टेक. चे शिक्षण घेत आहे. हे शिक्षण घेत असतानाच प्रियंका जाधव हिने स्पर्धा परीक्षेची तयारी करत जलसंपदा विभागाच्या (वॉटर रिसोर्स डिपार्टमेंट-डब्ल्यूआरडी) वतीने घेण्यात आलेली सरळसेवा भरती परीक्षा दिली होती. या परीक्षेत प्रियंका जाधव उत्तीर्ण झाली असून, तिची जलसंपदा विभागात कनिष्ठ अभियंता (ज्युनियर इंजिनीअर) या क्लास वनच्या पदावर नियुक्ती झाली आहे.
यावेळी प्रियंकाची आई मंदाकिनी जाधव, वडील कैलास जाधव, अमृत गोपीनाथ गायकवाड आदी उपस्थित होते.
यापुढील काळातही स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल, अशी ग्वाही स्नेहलता कोल्हे यांनी दिली.
Post Views:
178