आ काळेंमुळे ग्रामीण विकासाचा प्रश्न मार्गी – सौ. पोर्णिमा जगधने
वृत्तवेध ऑनलाईन 26 July 2020
By : Rajendra Salkar
कोपरगाव : आ.आशुतोष काळे यांचे योगदान असून त्यांच्या अथक प्रयत्नानामुळे झेडपी पंचायत समिती या माध्यमातून निधी मिळून कोपरगाव तालुक्याच्या ग्रामीण भागाच्या रखडलेल्या विकास कामांना वेग येवून आज प्रगतीपथावर असून विकासाचा प्रश्न मार्गी लागला असल्याचे प्रतिपादन सभापती सौ. पोर्णिमा जगधने यांनी खोपडी येथे ग्रामपंचायत इमारतीच्या भूमिपूजन प्रसंगी केले.
आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली झेडपी सदस्य सौ. सोनाली साबळे यांनी जनसुविधा योजनेअंतर्गत खोपडी ग्रामपंचायत नूतन इमारतीच्या बांधकामासाठी निधी दिला आहे त्याचे भूमिपूजन सभापती सौ. पौर्णिमा जगधने यांच्या शुभहस्ते पार पडले.
सौ जगधने म्हणाल्या की, ग्रामीण भागाचा विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी आमदार काळे यांचे मार्गदर्शनातून सर्वच जिल्हा परिषद ,पंचायत समिती सदस्यांना विकासकामे करतांना प्रेरणा मिळत असल्यामुळे ग्रामीण भागात सर्वसामान्य नागरिकांपर्यंत विकास पोहोचला आहे.
यावेळी जिल्हा परिषद सदस्या सौ. सोनाली साबळे, पंचायत समिती सदस्य मधुकर टेके, कोपरगाव जिनिंग चेअरमन गोरक्षनाथ जामदार, रा. यु. काँ. चे तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर, आदिनाथ वारकर, बाळासाहेब जाधव, बाळासाहेब वारकर, उपसरपंच शिवाजी वारकर, संतोष ठुबे, बाबासाहेब जाधव, रोहिदास जाधव, प्रमोद रायते आदी उपस्थित होते.