सोमवारी कोपरगावात ‘महाराष्ट्राचा हास्य कल्लोळ’
On Monday in Kopargaon, ‘Maharashtra’s Laughter’
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Sun2 April23 ,19.20 Pm
By राजेंद्र सालकर
कोपरगाव : सोमवारी (दि.०३) रोजी माजी खासदार कर्मवीर शंकरराव काळे यांच्या १०२ व्या जयंतीनिमित्त ‘महाराष्ट्राचा हास्य कल्लोळ’ कार्यक्रम आयोजित केला असून या कार्यक्रमासाठी रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कर्मवीर काळे मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
‘महाराष्ट्राचा हास्यकल्लोळ’ हा आगळा वेगळा कार्यक्रम कोपरगावच्या तहसील कार्यालयाच्या मैदानावर सोमवार सायंकाळी होत आहे.
यात सुप्रसिद्ध विनोदी कलाकार समीर चौगुले, चेतना भट, प्रसाद खांडेकर, नम्रता आवटे /संबेराव, वनिता खरात, रोहित माने यांच्या समवेत सुप्रसिद्ध गायक अंजली गायकवाड, चैतन्य देवरे, रील स्टार, सिने अभिनेत्री प्रसिद्ध नृत्यांगना माधुरी पवार आदी दिग्गज कलाकार आहेत.
कर्मवीर शंकरराव काळे यांच्या जयंती निमित्ताने चित्रपटात तसेच छोट्या पडद्यावर दिसणाऱ्या कलाकारांचे अभिनय जवळून पाहण्याची संधी प्रेक्षकांना उपलब्ध करून दिली आहे.
माजी खासदार कर्मवीर शंकरराव काळे यांची गुरुवारी ६ एप्रिल रोजी १०२ वी जयंती निमित्त त्यांच्या कारखाना कार्यस्थळावरील व पंचायत समिती समोरील पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करून पुष्पांजली अर्पण करण्यात येणार आहे अशी माहिती काळे मित्र मंडळाचे अध्यक्ष कारभारी आगवन व उपाध्यक्ष नारायण मांजरे यांनी केले आहे.