सावंतांच्या तोंडून राष्ट्रवादीचे मनसुबे बाळासाहेबांच्या विचारांना छेद देणारे – सौ.स्नेहलता कोल्हे
The ideas of NCP from the mouth of Savants contradicting Balasaheb’s thoughts – Mrs. Snehlata Kolhe
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Tue4 April23 ,17.20 Pm
By राजेंद्र सालकर
कोपरगाव: रिक्षावाल्याच्या हाताखाली काम करणार का? हा व्यवसाय भिमुखता पाहून दर्जा ठरवणारा राष्ट्रवादीचा अजेंडा यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादीने ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचे शिवधनुष्य उचलायला सांगितल्याचा ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांचा गौप्यस्फोट हा आश्चर्यकारक व धक्कादायक आहे.ही दोन वेगवेगळ्या विचारधारांची परिणीती असून बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना छेद देणारी असल्याची टीका भाजपा प्रदेश सचिव माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी केली. सावंतानी केलेल्या वाच्यतेमुळे राष्ट्रवादीने हिंदू मतविभाजन करून आपली राजकिय पोळी भाजण्यासाठी रिक्षा चालकांचा अपमान करण्याचे पाप केले या तत्त्वज्ञानाचा आम्ही निषेध करतो.
त्यापुढे म्हणाल्या,बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसैनिकाला आमदार करताना जात धर्म व्यवसाय पाहिला नाही तर त्याच्यातील संघटन कौशल्य, नेतृत्व गुण व समाजसेवा पाहिली सर्वसामान्य लोकांच्या अठरा पगड जाती एकत्र केल्या त्यामुळेच शिवसेना उभी राहिली. चहा विकणारा माणूस जर या देशाचा पंतप्रधान होऊ शकतो तर मग मुख्यमंत्री करताना त्याचा व्यवसाय पाहणारे तुम्ही कोण? लोकशाहीत मान आणि खुर्ची देताना माणसे थोपली जात नाहीत तुमच्या आमच्या आवडीपेक्षा लोकमान्यता, समाजमान्यता, नेतृत्व गुण यावर जनता निवडून देते. तेव्हा कोता विचार सोडून द्या.
सौ. कोल्हे पुढे म्हणाल्या, सत्ता आणि पक्ष एकच व्यक्ती सांभाळू शकत नाही हा पूर्वीपासून सेनेचा नियम होता म्हणूनच बाळासाहेबांनी स्वतः व उद्धव ठाकरे घरात असतानाही मनोहर जोशी व नारायण राणे यांना मुख्यमंत्री केले. नियम पाळला म्हणूनच शिवसेना संघटित राहिली.शिवसेनेत दुफळी निर्माण होण्याची परिस्थिती निर्माण करून स्वतःची ताकद वाढवण्यासाठी राष्ट्रवादीने उद्धव ठाकरे यांना सोयीस्करपणे जाळ्यात अडकवून राजकीय डाव यशस्वी केला. रिक्षाचालक हे स्वाभिमानाने आपला व्यवसाय करतात,नागरिकांना सुविधा देतात.व्यवसाय जात पात या पलीकडे जाऊन प्रत्येकाला समाज प्रवाहात आपले स्थान निर्माण करण्यासाठी अधीकार आहे त्यातून अनेक नेते उदयाला आले आहेत व बाळासाहेब ठाकरे यांनीही अनेक लहान माणसे संधी देऊन मोठी केली.हे तत्व सोडुन शिवसेना कशी कमकुवत करण्याचे काम राष्ट्रवादीने केले आहे.
आदित्य ठाकरे तिसऱ्या पिढीचे म्हणून मान्य झाले असते आणि उद्धव ठाकरे पक्षप्रमुख म्हणून राहिले असते तर दबदबा राहिला असता पण रिक्षावाल्याच्या हाताखाली काम करणार का ? असे म्हणत उद्धवजी हे शिवधनुष्य तुम्हालाच उचलावे लागेल अशी गळ टाकणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी प्रस्थापित म्हणून ठाकरेंचे दोन्ही कार्ड वापरायला लावून आपला डाव साधला. हिंदुत्व मताच्या विभाजनासाठी हे घडवले गेले हे अरविंद सावंत यांच्या तोंडून सत्य बाहेर येऊन उघड झाले,परंतु घूमजाव करत अरविंद सावंत यांनी ते पटकन सावरून घेण्याचा प्रयत्न केला असला तरी राष्ट्रवादी काँग्रेसची भालवण करण्याच्या नादात सावंतांनी आयुष्यभर साथ देणाऱ्या आणि रक्त सांडणाऱ्या रिक्षा चालकांचा मात्र अपमानच केला आहे याचे पडसाद सर्वत्र उमटतीलच असेही त्या म्हणाल्या.
Post Views:
148