कोपरगाव शहरातील ११.९५ कोटी निधीस प्रशासकीय मान्यता – आ.आशुतोष काळे
Administrative approval of 11.95 crore fund in Kopargaon city – A. Ashutosh Kale
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Wed 5 April23 ,16.30 Pm By राजेंद्र सालकर
कोपरगाव : शहरातील विविध विकासकामांसाठी सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियान(जिल्हास्तर) साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे दलित वस्ती सुधारणा योजना, नागरी दलितेतर वस्ती सुधारणा योजनेंतर्गत कोपरगाव शहरातील विविध विकास कामांसाठी ११ कोटी ९५ लाख ३६ हजार रुपये निधीस प्रशासकीय मान्यता मिळाली असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.
या कामांमध्ये प्रभाग क्रमांक १ ते १४ प्रभागांचा समावेश असून प्रत्येक प्रभागात खडीकरण रस्ते खडीकरण भुयारी गटारी डांबरीकरण काँक्रिटीकरण पेविंग ब्लॉक महिला पुरुष शौचालय बांधणे या कामांचा समावेश असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली आहे. आ. आशुतोष काळे यांनी मागील साडे तीन वर्षात कोपरगाव शहराचा अनेक वर्षापासुनचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्या बरोबरच शहरातील रस्त्यांना व सुशोभिकरणाला देखील कोट्यावधी रुपयांचा निधी दिल्यामुळे रुळावर घसरलेली कोपरगाव शहराच्या विकासाची गाडी पुन्हा रुळावर आली असून आ. आशुतोष काळेंच्या प्रयत्नातून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होत असल्यामुळे विकासाची गाडी सुसाट सुटली आहे. त्यामुळे नागरिकांनी होत असलेल्या विकासाबद्दल आ. आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे.