स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अवमान सहन करणार नाही ; सावरकर यात्रेत स्नेहलता कोल्हेंचा इशारा

स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अवमान सहन करणार नाही ; सावरकर यात्रेत स्नेहलता कोल्हेंचा इशारा

Freedom hero Savarkar will not tolerate contempt; Snehalata Kohle  warning in Savarkar Yatra

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Thu 6 April23 ,16.30 Pm
By राजेंद्र सालकर

कोपरगाव: स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान होत असेल, तर तो आम्ही कदापि सहन करणार नाही. ज्यांनी देशासाठी बलिदान दिले. त्यांचा अशा पद्धतीने काँग्रेस आणि राहुल गांधींकडून वारंवार अवमान होत असेल, तर तो आम्ही सहन करणार नाही. सावरकरांच्या देशभक्तीवर शंका घेऊन त्यांचा अवमान करण्याचा कुणाला अधिकार नाही प्रखर राष्ट्रभक्ती व हिंदुत्वाचा विज्ञाननिष्ठ विचार मांडणारे स्वातंत्र्यवीर सावरकर हे समस्त भारतीयांचे दैवत आहे, असे  भाजपा प्रदेश सचिव माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी कोपरगाव  भारत गौरव यात्रेच्या समारोपाप्रसंगी  बोलताना सांगितले.

गुरुवारी (६ एप्रिल) रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या सन्मानार्थ कोपरगाव शहरातून भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून शिवसेना रिपाई आठवले गट व सावरकर प्रेमी नागरिक यांच्या उपस्थितीत गुरुद्वारा रोड आमदार स्नेहलता कोल्हे यांचे संपर्क कार्यालय अहिंसा चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत अभिवादनाने माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे संपर्क कार्यालय अशी भव्यदिव्य स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेचा समारोप करण्यात आला 
स्नेहलता कोल्हे म्हणाल्या, महापुरुषांचा अपमान करणे ही आपली भारतीय संस्कृती नाही, तरीदेखील काँग्रेस आणि त्यांच्या नेत्यांकडून वारंवार स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला जातो, एकाच व्यक्तीला दोन जन्मठेप झाल्या, असे वीर सावरकर एकमेव आहेत. ब्रिटीश सरकारने दोन जन्मठेपांची शिक्षा ठोठावल्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर ब्रिटिशांना म्हणाले होते की, तुम्ही दोन जन्मठेपांची शिक्षा मला देता तोपर्यंत तुमचे राज्य राहणार आहे का? हे सांगण्याची धमक असलेले वीर सावरकर होते. याकडे त्यांनी लक्ष वेधले.
राहुल गांधी, तुम्ही मोठा अक्षम्य अपराध केला आहे, आता तरी मनाचा मोठेपणा दाखवा आणि भारतीयांची माफी मागा. राहुल गांधी असो व इतर कोणी असो, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान कोणी केला तर ते अजिबात खपवून घेतले जाणार नाही, असं स्पष्ट  इशारा सौ कोल्हे यांनी शेवटी दिला.
यावेळी भाजपचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, भाजयुमोचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष श्रीराज डेरे, अमृत संजीवनी शुगर केनचे   अध्यक्ष पराग संधान, भाजपचे तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम, शहराध्यक्ष दत्ता काले,  रवींद्र पाठक,  राजेंद्र सोनवणे, कैलास खैरे, भाजयुमोचे तालुकाध्यक्ष विक्रम पाचोरे, शहराध्यक्ष अविनाश पाठक,  बबलू वाणी, महिला  शहराध्यक्षा वैशाली आढाव,  विद्या सोनवणे, मंगल आढाव, दीपा गिरमे, नारायणशेठ अग्रवाल, जयेश बडवे, वैभव गिरमे, अंबादास देवकर, सुनील देवकर, उत्तमराव चरमळ, कैलास रहाणे, विजय डांगे, अनिल शिंदे, सुरेश जाधव, विजय जामदार, राजेंद्र चांडे, विजय जाधव, हरिभाऊ लोहकणे, सुधाकर गाढवे,अंकुश कुऱ्हे, डॉ. गोरक्षनाथ मोरे, रवींद्र वल्हे, प्रशांत वाबळे, निखील औताडे, लक्ष्मीकांत संवत्सरकर, बापू वाणी, नसीरभाई सय्यद, पुंजाभाऊ राऊत, हरिभाऊ लोहकणे, सुधाकर गाढवे, रवींद्रअण्णा पाठक, कैलास खैरे, प्रभाकर आव्हाड, सुशांत खैरे, जयेश बडवे, रिपाइं नेते जितेंद्र रणशूर, पिंटू नरोडे, शिवाजीराव खांडेकर, प्रसाद आढाव, खालिकभाई कुरेशी, अल्ताफभाई कुरेशी, संजय जगदाळे, राजेंद्र बागुल, दादासाहेब नाईकवाडे, महेश खामकर,सुशांत खैरे, रवींद्र लचुरे, वैभव आढाव, सचिन सावंत, रवींद्र रोहमारे, फकिर मोहम्मद पहिलवान, देवराम पगारे, सलीम पठाण, सतीश रानोडे, जयप्रकाश आव्हाड, अनिल गायकवाड, हाशमभाई, शफिक सय्यद, हुसेन सय्यद, संतोष साबळे, गोपीनाथ गायकवाड, रवींद्र नरोडे, शरद त्रिभुवन, सिद्धू भाटिया, गजू खिलारी, बापू पवार, सलीम मन्सुरी, अंकुश जोशी, अण्णा खरोटे, मुन्ना दरपेल, रज्जाक पटेल, किरण सुपेकर, विक्की सोनवणे, नरेंद्र लकारे, राहुल सूर्यवंशी, चंद्रकांत वाघमारे, रोहन दरपेल, गोपीनाथ सोनवणे,प्रभुदास पाखरे, कैलास गवारे, विजयराव चव्हाणके, आशिष उदावंत, अय्युब बागवान, रमेश भोपे आदींसह भाजप, भाजयुमो व रिपाइं (आठवले गट) चे पदाधिकारी, भाजप बुथप्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख, विविध संस्थांचे आजी-माजी संचालक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
 

Leave a Reply

You cannot copy content of this page