कोल्हे परिवाराला कायम साथ द्या, समाजसेवेचा हा यज्ञ अखंड चालूच राहील सौ स्नेहलता कोल्हे
Support the Kolhe family forever, this sacrifice of social service will continue forever Dear Snehalata Kolhe
भाजपाचा ४४ वा स्थापना दिवस44th Foundation Day of BJP
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Thu 6 April23 ,16.40 Pm
By राजेंद्र सालकर
कोपरगाव : मतदारसंघातील जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी व सर्वांगीण विकासासाठी काम करत आहोत. यापुढील काळातही कोल्हे परिवाराला कायम साथ द्या, समाजसेवेचा हा यज्ञ अखंड चालूच राहील असे आश्वासन भाजपचे सचिव माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी भाजप स्थापना दिली कार्यक्रमात दिले.
प्रारंभी स्नेहलता कोल्हे व पक्ष पदाधिकाऱ्यांच्या हस्ते भारतमाता, थोर क्रांतिकारक जनसंघाचे संस्थापक शामाप्रसाद मुखर्जी, पंडित दीनदयाळ उपाध्याय व स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी स्नेहलता कोल्हे यांनी भाजप स्थापना दिन व श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या.
स्नेहलता कोल्हे म्हणाल्या, शामाप्रसाद मुखर्जी यांनी १९५१ साली जनसंघाची स्थापना केली. स्वातंत्र्योत्तर काळात पंडित दीनदयाळ उपाध्याय,शामाप्रसाद मुखर्जी तदनंतर अटलबिहारी वाजपेयी आदींच्या माध्यमातून काँग्रेस पक्षासमोर प्रमुख विरोधी पक्ष म्हणून त्या काळात जनसंघ पुढे आला. त्यानंतर ६ एप्रिल १९८० रोजी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी व माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्वाखाली जनसंघातून बाहेर पडलेल्या नेत्यांनी भारतीय जनता पक्षाची स्थापना केली.
सध्या १२ राज्यांमध्ये भाजपचं सरकार आहे. लोकसभेत पक्षाच्या ३०३ जागा आहेत, तर राज्यसभेतही सुमारे १०० खासदार भाजपचे आहेत. गेल्या नऊ वर्षात पक्षाने १२ कोटींहून अधिक लोकांना आपले सदस्य बनवले आहे. त्यामुळे भाजप सध्या सगळ्यात मोठा पक्ष असून आज भाजपचा स्थापना दिन मोठ्या उत्साहात पार पडत आहे
भाजप हा केवळ एक पक्ष नसून एक विचार आहे. ‘सबका साथ, सबका विश्वास, सबका विकास’ या त्रिसूत्रीवर भर देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी अनेक योजना सुरू केल्या
भाजपला त्यागाचा आणि बलिदानाचा मोठा इतिहास आहे. कार्यकर्त्यांनी भाजपचा विचार आणि केंद्रातील व राज्यातील भाजप सरकारने जनतेच्या कल्याणासाठी सुरू केलेल्या विविध योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवून पक्ष अधिक बळकट करावा, असे आवाहन त्यांनी शेवटी केले.
प्रास्ताविक भाजप तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम तर सूत्रसंचालन भाजयुमोचे तालुकाध्यक्ष विक्रम पाचोरे यांनी केले.
यावेळी भाजपचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, भाजयुमोचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष श्रीराज डेरे, अमृत संजीवनी शुगर केनचे अध्यक्ष पराग संधान, भाजपचे तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम, शहराध्यक्ष दत्ता काले, रवींद्र पाठक, राजेंद्र सोनवणे, कैलास खैरे, भाजयुमोचे तालुकाध्यक्ष विक्रम पाचोरे, शहराध्यक्ष अविनाश पाठक, बबलू वाणी, महिला शहराध्यक्षा वैशाली आढाव, विद्या सोनवणे, मंगल आढाव, दीपा गिरमे, नारायणशेठ अग्रवाल, जयेश बडवे, वैभव गिरमे, अंबादास देवकर, सुनील देवकर, उत्तमराव चरमळ,
कैलास रहाणे, विजय डांगे, अनिल शिंदे, सुरेश जाधव, विजय जामदार, राजेंद्र चांडे, विजय जाधव, हरिभाऊ लोहकणे, सुधाकर गाढवे,अंकुश कुऱ्हे, डॉ. गोरक्षनाथ मोरे, रवींद्र वल्हे, प्रशांत वाबळे, निखील औताडे, लक्ष्मीकांत संवत्सरकर, बापू वाणी, नसीरभाई सय्यद, रिपाइं नेते जितेंद्र रणशूर, पिंटू नरोडे, शिवाजीराव खांडेकर, प्रसाद आढाव, खालिकभाई कुरेशी, अल्ताफभाई कुरेशी, संजय जगदाळे, राजेंद्र बागुल, दादासाहेब नाईकवाडे, महेश खामकर,सुशांत खैरे, रवींद्र लचुरे, वैभव आढाव, सचिन सावंत, रवींद्र रोहमारे, फकिर मोहम्मद पहिलवान, देवराम पगारे, सलीम पठाण, सतीश रानोडे, जयप्रकाश आव्हाड, अनिल गायकवाड, हाशमभाई, शफिक सय्यद, हुसेन सय्यद, संतोष साबळे, गोपीनाथ गायकवाड, रवींद्र नरोडे, शरद त्रिभुवन, सिद्धू भाटिया, गजू खिलारी, बापू पवार, सलीम मन्सुरी, अंकुश जोशी, अण्णा खरोटे, मुन्ना दरपेल, रज्जाक पटेल, किरण सुपेकर, विक्की सोनवणे, नरेंद्र लकारे, राहुल सूर्यवंशी, चंद्रकांत वाघमारे, रोहन दरपेल, गोपीनाथ सोनवणे,प्रभुदास पाखरे, कैलास गवारे, विजयराव चव्हाणके, आशिष उदावंत, अय्युब बागवान, रमेश भोपे आदींसह भाजप, भाजयुमो व रिपाइं (आठवले गट) चे पदाधिकारी, भाजप बुथप्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख, विविध संस्थांचे आजी-माजी संचालक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी पुंजाभाऊ राऊत, हरिभाऊ लोहकणे, सुधाकर गाढवे, रवींद्रअण्णा पाठक, कैलास खैरे, प्रभाकर आव्हाड, सुशांत खैरे, जयेश बडवे, नसीरभाई सय्यद, वैभव आढाव आदी ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. भाजप स्थापना दिनानिमित्त स्नेहलताताई कोल्हे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज व अन्य महापुरुषांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
Post Views:
127