कर्मवीर शंकरराव काळे यांना १०२ व्या जयंती निमित्त  अभिवादन                    

कर्मवीर शंकरराव काळे यांना १०२ व्या जयंती निमित्त  अभिवादन

  Greetings to Karmaveer Shankarao Kale on his 102nd birth anniversary

    Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Thu 6 April23 ,16.00 Pm
By राजेंद्र सालकर

कोपरगाव – कोसाका उद्योगाचे समुहाचे संस्थापक शिक्षण महर्षी माजी खासदार कर्मवीर शंकरराव काळे यांची १०२ वी जयंती कर्मवीर शंकरराव काळे मित्र मंडळाच्या वतीने कारखाना कार्यस्थळावरील कर्मवीर शंकरराव काळे स्मृती उद्यान गौतमनगर येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी कर्मवीर शंकररावजी काळे यांना अभिवादन करण्यासाठी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना, उद्योग समूह व सर्व सलग्न संस्थांचे चेअरमन,व्हा.चेअरमन, पदाधिकारी, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते व हितचिंतकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.

याप्रसंगी माजी आमदार अशोकराव काळे,   सौ. पुष्पाताई काळे, आ. आशुतोष काळे, सौ. चैताली काळे, कर्मवीर शंकरराव काळे मित्रमंडळाचे अध्यक्ष कारभारी आगवण, उपाध्यक्ष नारायण मांजरे, अॅड. प्रमोद जगताप, व्हा. चेअरमन दिलीपराव बोरनारे, सर्व संचालक मंडळ, प्रभारी कार्यकारी संचालक सुनील कोल्हे, आसवनी विभागाचे जनरल मॅनेजर ज्ञानेश्वर आभाळे, सेक्रेटरी बाबा सय्यद, असि. सेक्रेटरी संतोष शिरसाठ, प्राचार्य डॉ. शंकरराव थोपटे, रयत शिक्षण संस्थेचे सहाय्यक विभागीय अधिकारी शिवाजी  तापकीर, माजी जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, रयत शिक्षण संस्थेच्या सर्व शाळा-महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समुहावर प्रेम करणारे हितचिंतक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    तसेच कोपरगाव शहरातील पंचायत समितीच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या कर्मवीर शंकरराव काळे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास देखील आ. आशुतोष काळे यांनी पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले यावेळी मान्यवर व कोपरगाव राष्ट्रवादीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  

Leave a Reply

You cannot copy content of this page