शेतकऱ्यांना कांदा अनुदानापासून वंचित ठेवू नका; उताऱ्यावर कांद्याची नोंदी लावा –   विवेक कोल्हे

शेतकऱ्यांना कांदा अनुदानापासून वंचित ठेवू नका; उताऱ्यावर कांद्याची नोंदी लावा –   विवेक कोल्हे

Do not deprive farmers of onion subsidy; Put onion logs on the passage – Vivek Kolhe

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Fir 7 April23 ,19.00 Pm
By राजेंद्र सालकर

कोपरगाव : ज्या शेतकऱ्यांनी सातबारा उताऱ्यावर कांद्याच्या नोंदणी लावल्या आहेत अशा शेतकऱ्यांना शिंदे फडणवीस सरकारने जाहीर केलेले ३५० रुपये प्रतिक्विंटल अनुदान मिळणार आहे तेव्हा तलाठ्यांनी  शेतकऱ्यांच्या सातबारावर सही शिक्कानिशी   कांद्याच्या नोंदी कराव्यात अशा स्पष्ट सूचना जिल्हा  जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांना केले आहे

विवेक कोल्हे म्हणाले, कांद्याच्या दरातील घसरणीमुळे बाजारात कांद्याला कोडीमोल किंमत आहे संकटातील संकटात सापडलेल्या कांदा शेतकऱ्यांना दिलासा मिळवा यासाठी माजी आमदार स्नेहलता कोल्हे व विवेक कोल्हे यांनी राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारने याबाबत निर्णय जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शिंदे फडणवीस सरकारने प्रतिक्विंटर ३५० रुपये सानुग्रह  अनुदान जाहीर केले आहे 
विवेक कोल्हे म्हणाले   येत्या ३ एप्रिलपासून २० एप्रिल २०२३ पर्यंत अर्ज सादर करायचा आहे. हे अनुदान केवळ राज्यात कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना तसेच फक्त लेट खरीप हंगामातील लाल कांद्याला मिळणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी सातबारा उताऱ्यावर कांदा पिकाची नोंद केली आहे अशाच शेतकऱ्यांना अनुदान मिळेल, असे शासन निर्णयात म्हटले आहे. यामुळे ज्या शेतकऱ्यांनी कांदा पिकाची नोंद केलेली नाही असे शेतकरी या अनुदानापासून वंचित राहण्याची भीती आहे.ज्यांच्या सातबाऱ्यावर कांद्याची नोंदच नाही; पण शेतकऱ्यांनी कांदा विक्री केल्याची व्यापारी व बाजार समितीकडे नोंद असून, पावत्याही आहेत. त्यामुळे याच पावत्या अधिकृत धरून अनुदान देण्यात यावे. सातबारा उताऱ्याच्या नोंदीची सक्ती करू नये, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. याबाबत महसूल विभागाने सर्व तलाठ्यांना त्वरित निर्देश द्यावेत, अशी मागणी  कोल्हे यांनी केली आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page