सावधान : कोपरगावात रविवारी दिवसभरात ३ जण पॉझिटिव्ह ; १५ जणांवर उपचार सुरू

सावधान : कोपरगावात रविवारी दिवसभरात ३ जण पॉझिटिव्ह ; १५ जणांवर उपचार सुरू

शहर १३ ॲक्टिव , ग्रामीण २ ॲक्टिव ,

कोपरगाव कोरोना अपडेट : २६ जुलै २०२०
५१० तपासण्या, ४८ जण कोरोना ग्रस्त, ३२ जण कोरोनामुक्त, तर एका महिलेचा मृत्यू, १५ जण  ॲक्टिव, ४६२ अहवाल निगेटिव्ह- डॉ. फुलसौंदर

कोरोना रुग्ण अपडेट : ८ जणांना डिस्चार्ज, बाधित रूग्ण एकुण १५ पैकी शहर (१३) ग्रामीण (२)
रवंदा १ , पढेगाव १, विवेकानंद नगर २, बालाजी अंगण ४, साई सिटी २ व रुईकर वस्ती १,गांधीनगर २, कालेमळा २

डिस्चार्ज ८ : सुरेगाव १,करंजी १, शामवाडी १, धारणगाव १, सहजानंदनगर १,शहरात इंदिरापथ श्रध्दा पॅरडाईज १, सुखशांतीनगर २,

वृत्तवेध ऑनलाईन | 26 July 2020,
By: Rajendra Salkar 

कोपरगाव : दरम्यान रविवारी सकाळी
सुरेगाव १, करंजी १, शामवाडी १, धारणगाव १, सहजानंदनगर १,शहरात इंदिरापथ श्रध्दा पॅरडाईज १, सुखशांतीनगर २, हे आठ जण कोरोना मुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. तर ७० जणांचे नमुने घेण्यात आले होते, पैकी ५० जणांचे नमुने नगर येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले तर उर्वरित

२० जणांच्या नमुन्याची रॅपिड अ‍ॅण्टिजेन चाचणी केली. यात काले मळ्यातील दोन व गांधीनगरमधील एक असे तीन जण पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले अशी माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालय येथे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कृष्णा फुलसौंदर यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती देताना डॉ. फुलसौंदर म्हणाले, रविवारी (२६जुलै) रोजी सकाळी कोरोनाग्रस्तांच्या संपर्कातील ७० संशयितांचे नमुने घेण्यात आले, यापैकी ५० नमुने नगर येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले, तर उर्वरित २० जणांची कोविड सेंटर मध्ये रॅपिड अ‍ॅण्टिजेन तपासणी करण्यात आली, यात तीन जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान कोवीड सेंटर मध्ये 15 जन उपचार घेत असून एक जण नाशिक व दोन जण येथे खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत तर ३५ जण होम क्वॉरंटाईन आहेत. अशी माहिती डॉ. वैशाली बडदे (आव्हाड) यांनी दिली.

तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाटे कोपरगाव ग्रामीण वैद्यकीय अधिकारी डॉ. कृष्णा फुलसौंदर विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे (आव्हाड) रुग्णांवर लक्ष ठेवून आहेत. दरम्यान लोकांनी काम असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहनही आरोग्य प्रशासनाने केले आहे.नागरिकांनी प्रशासनाने सांगितलेले नियम पाळून, स्वतःची काळजी घेणे आता गरजेचे बनले आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page