आमदार काळे यांच्या निधीतून शहापूर रस्त्यांचे काम सुरु,
The work of Shahapur roads started with the funds of MLA Kale.
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Sat 8 April23 ,19.10 Pm
By राजेंद्र सालकर
कोपरगाव : आ. आशुतोष काळे यांनी आपल्या स्थानिक विकास निधीतून १० लाखाचा निधी शहापूर गावातील ओसपांढरी परिसरातील रस्त्याच्या खडीकरणासाठी दिला होता. या निधीतून या रस्त्याच्या कामास शहापूर ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच श्रीमती योगिता घारे (डांगे) यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला आहे.
शहापूर गावातील ओसपांढरी परिसरात रस्त्याची मोठी अडचण होती. त्याबाबत ग्रामस्थांनी आ. आशुतोष काळे यांच्याकडे या रस्त्याच्या दुरस्तीसाठी निधी मिळावा अशी मागणी केली होती. त्या मागणीची दखल घेवून आ. आशुतोष काळे यांनी १० लाख निधी दिला होता. या निधीतून या रस्त्याच्या कामास सुरुवात झाली आहे. त्यामुळे मागील अनेक वर्षापासूनची रस्त्याची अडचण दूर झाल्यामुळे शहापूर ग्रामस्थांनी आ. आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे.
यावेळी उपसरपंच सागर किसन घारे, ग्रामपंचायत सदस्य सागर भास्कर घारे तसेच राष्ट्रवादीचे रामनाथ घारे, अशोक डांगे, जनार्दन पाचोरे, वसंत पाचोरे, राजेंद्र पाचोरे, शिवाजी सदाफळ, गणेश घारे, रमेश डांगे, गोरख पाचोरे, सचिन पाचोरे, कैलास डांगे, बाळासाहेब पाचोरे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.