कांदा अनुदानासाठीची  सात बारा उता-यावरील  नोंदीची अट शिथिल करा – आ. आशुतोष काळे

कांदा अनुदानासाठीची  सात बारा उता-यावरील  नोंदीची अट शिथिल करा – आ. आशुतोष काळे

Relax the condition of entry for Onion Subsidy in Sections 7 and 12 – A. Ashutosh Kale

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Sat 8 April23 ,19.20 Pm
By राजेंद्र सालकर

कोपरगाव  : कांदा अनुदानासाठी सरकारने ठेवलेल्या साडेतीनशे रुपये समुद्र अनुदानापासून शेतकरी वंचित राहू नये यासाठी  सात बारा कुत्र्या वरील कांदा नोंदीची हाट शिथिल करावी अशी मागणी आमदार अशितोष काळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  व महसूलमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

दिलेल्या निवेदनात आ.आशुतोष काळे यांनी असे म्हटले आहे की, शासनाकडून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रती क्विंटल तीनशे पन्नास रुपये अनुदान देण्यात येणार आहे. मात्र त्यासाठी विक्री केलेल्या कांद्याची मूळ हिशोब पट्टी बरोबरच शेतकऱ्यांच्या सात बारा उताऱ्यावर कांदा पिकाची नोंद असणे देखील आवश्यक असल्याची अट घालण्यात आली आहे. परंतु असंख्य शेतकऱ्यांच्या सात बारा उताऱ्यावर कांदा पिकाची नोंद नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांना अनुदान मिळण्यात अडचणी येणार आहेत.

कांदा पिकाला अनुदान देवून देखील केलेला खर्च सुद्धा निघणार नाही इतका कमी दर कांद्याला मिळत आहे. त्यामुळे सर्वच कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ मिळणे गरजेचे आहे. ई पिक पाहणी संदर्भात पूर्ण माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नाही. ई पिक पाहणीचा कालावधी देखील संपलेला असून ई पिक पाहणी मध्ये शेतकऱ्यांना नोंदी करतांना अडचणी आल्या आहेत.  अशा शेतकऱ्यांना सवलत देवून त्यांच्या कांदा पिकाची नोंद हस्तलिखित स्वरुपात करून घेण्याच्या सूचना महसूल विभागाला द्याव्या अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी दिलेल्या निवेदनात केली आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page