ब्रेक फेल झाल्याने पिकअप विहीरीतकोसळली;आदिवासी तरूणाचा मृत्यू,
Pickup crashes into well due to brake failure; tribal youth dies
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Sat 8 April23 ,19.30 Pm
By राजेंद्र सालकर
कोपरगाव : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर जोगेश्वरी इंग्लिश मिडीयम स्कुलचे पाठीमागे, डाऊच खुर्द, ता.कोपरगाव शिवारात ब्रेक फेल झाल्याने समृद्धी महामार्गालगत सर्व्हिस रोडच्या कडेला असलेल्या 50 ते 60 फूट खोल विहिरीत कोसळल्याची घटना घडली आहे. यात एका तरूणांचा मृत्यू झाला
याबाबत अधिक माहिती अशी की, शुक्रवारी (7) रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील समृद्धी महामार्गावरील डाऊन खुर्द शिवारात सर्व्हिस रोडच्या कडेला विद्युत पोल उभारणीचे काम रुपचंद bepl कन्स्ट्रक्शन कंपनीमार्फत करण्यात येत आहे त्यासाठी महिंद्रा रमेश गवळी रा. मढी खुर्द ता. कोपरगाव यांच्या पिकअप गाडीचे ब्रेक फेल झाल्याने समृद्धी महामार्गाच्या उतारावरून खाली जात .
कडेला असलेल्या 50 ते 60 फूट खोल विहिरीत पडली या पिकअप गाडीतील
क्लिनर जगन सिमा पाडवी (20) मजुर मूळ राहणार सरदारनगर तळोदा जिल्हा नंदुरबार मात्र त्या गाडीबरोबर विहिरीतील पाण्यात बुडाले. गाडीबरोबर विहिरीतील पाण्यात बुडाला असून गाडीचालकाने प्रसंगावधान राखत गाडीतून उडी मारत आपला जीव वाचविला होता.
सदर विहिरीत 40 ते 50 फूट पाणी असून ते पाणी मोटारीच्या साहाय्याने काढण्याचे काम तब्बल सहा ते सात सुरू होते. रात्री 9 वाजेच्या सुमारास पिकअप गाडी पाण्याबाहेर काढण्यात आली त्यानंत रात्री साडे अकराच्या सुमारास तो मृतदेह काढण्यात आला आहे. सदर घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
घटनास्थळी महाराष्ट्र सुरक्षा बल चे निरीक्षक विलास कुरहे ,कोपरगाव नगरपालिका अग्निशामक दल,विविध रुग्णवाहिका, कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक रामराव ढिकले, उपपोलिस निरीक्षक रोहिदास ठोंबरे, महामार्ग पोलीस,समृध्दी महामार्ग अधिकारी, क्रेन मशीन यंत्रणा,माजी सरपंच संजय गुरसल,पोलिस पाटील बाळासाहेब गायकवाड, सुधाकर वक्ते,भास्कर होन,सुनील होन,सागर होन,राजेंद्र वक्ते,सोमनाथ होन, पंकज पुंगळ, सर्व यंत्रणा घटनास्थळी उशिरापर्यत त्या इसमाचा शोध घेत होते. यावेळी समृध्दी महामार्गावर बघ्यांची मोठी गर्दी जमली होती.
कालू सीमा पडवी (28) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी पिकअप चालक महिंद्रा रमेश गवळी रा. मढी खुर्द याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल के एस जाधव करीत आहे
Post Views:
137