पाचशे रुपये दिले नाही म्हणून वृद्धास मारहाण; तीन जखमी, सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल
Beating an old man for not paying five hundred rupees; Three injured, case registered against seven people
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Sat 8 April23 ,19.40 Pm
By राजेंद्र सालकर
By राजेंद्र सालकर
कोपरगाव :पाचशे रुपये दिले नाही म्हणून वृद्धास मारहाण; तीन जखमी झाले असून , सात जणांविरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
याप्रकरणी वसीम सय्यद बागवान,(27) , धंदा व्यवसाय, रा.आयशाकॉलनी,कोपरगाव यांच्या फिर्यादीवरून शाहरुख आकलीस शेख रा.सुभाषनगर श, सोहेल जावेद पठान रा.सुभाषनगर, ,राजु आरिफ शेख रा.संजयनगर,गोलु ऊर्फ गगणदिप सिंग रा.सुभाषनगर कोपरगाव मुळ रा.अमृतसर राज्य पंजाब, विजय आरक रा.सुभाषनगर ,शुभम ऊर्फ लारा जाधव,रा.सुभाषनगर गोटया पुर्ण नाव माहीती नाही सर्व राहणार कोपरगाव यांच्याविरुद्ध शुक्रवारी (7) रोजी रात्री 22.30 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मारहाणीत सय्यद अहमद बागवान, अकबर फकिरा बागवान, जावेद सय्यद बागवान सर्व रा.सुभाषनगर कोपरगाव हे जण जखमी झाले आहेत
आरोपी यांना फिर्यादी वसीम सय्यद बागवान यांनी कामासाठी 500/-रुपये अडव्हांस दिले नाही म्हणुन वरील आरोपींनी बेकायदेशीरपणे जमाव करुन फिर्यादीचे घरात घुसुन फिर्यादीचे वडिलांना सय्यद बागवान यांना लाकडी दांडयाने व फिर्यादीचे भाउ जावेद बागवान,मामाचा मुलगा अकबर फकिरा बागवान यांना त्यांचे हातातील विटा फेकुन मारुन जखमी करुन शिवीगाळ केली. व तुम्हांला सोडणार नाही अशी धमकी देवुन तेथुन पळुन गेले. आरोपींनी विटा फेकुन मारल्याने इम्मतीयाज कोथमिरे यांचे घराच्या काचा फुटुन नुकसान झाले आहे.
वसीम सय्यद बागवान यांच्या फिर्यादीवरुन शहर सात जणाविरुद्ध गुन्हा दाखल आहे. पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई रोहीदास ठोंबरे अधिक तपास करीत आहेत.