वेळापूर येथे कल्याण मटका अड्ड्यावर छापा; एकाला अटक

वेळापूर येथे कल्याण मटका अड्ड्यावर छापा; एकाला अटक

Raid on Kalyan Matka hideout at velapur; One arrested

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Sat 8 April23 ,19.50 Pm
By राजेंद्र सालकर

कोपरगाव : तालुक्यातील वेळापुर येथील हाँटेल द्वारकामाई च्या पाठिमागे सुरू असलेल्या जुगाराच्या अड्ड्यावर गुन्हे शाखे च्या पथकाने शुक्रवारी (7) रोजी दुपारी पावणे दोन वाजेच्या सुमारास छापा टाकला.  कारवाईत एक जणांला ताब्यात घेण्यात आले आहे.

वेळापुर येथील हाँटेल द्वारकामाईच्या पाठिमागे काही व्यक्ती कल्याण, मुंबई  या नावाचा मटका जुगार चालवत असल्याची माहिती गुन्हे शाखे  ला मिळाली होती. या माहितीच्या आधारे 
सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार ढाकराव यांच्या पथकाने शुक्रवारी(7) रोजी  दुपारी पावणे दोन वाजेच्या सुमारास  जुगाराच्या अड्डयावर छापा मारला होता. या छाप्यात पोलिसांनी मटका खेळवणारे  गोपीनाथ वाघ यांना रोख रक्कम बाराशे सह कार्बन पेपर दोन पेन कागदी चिठ्ठ्या सह ताब्यात घेतले.  ताब्यात घेण्यात आलेल्यांवर कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात पो काँ किसनराव सानप यांच्या तक्रारीवरून कोपरगाव  तालुका पोलीस स्टेशन ला वरिल आरोपी विरोधात जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला  असून तालुक्याच्या पश्चिम भागातील कोळपेवाडी सुरेगाव देर्डे चांदवड चासनळी धामोरी रंवदा भागामध्ये राजरोसपणे मटका चालवणाऱ्यांचा शोध सुरू आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page