कोपरगावासह  तालुक्यात डॉ. बाबासाहेब  आंबेडकरांची 132 वी जयंती उत्साहात साजरी

कोपरगावासह  तालुक्यात डॉ. बाबासाहेब  आंबेडकरांची 132 वी जयंती उत्साहात साजरी

Dr. in the taluka with Kopargaon. Babasaheb Ambedkar’s 132nd birth anniversary was celebrated with enthusiasm

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Sat15 April23 ,14.00 PmBy राजेंद्र सालकर

कोपरगाव : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती कोपरगाव नगरपरिषदेच्या वतीने शुक्रवारी  (दि.१४) रोजी रात्री १२:०० वा. परंपरेनुसार मुख्याधिकारी तथा प्रशासक शांताराम गोसावी व कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या हस्ते ध्वजारोहण करून जल्लोषात साजरी करण्यात आली.  

 देशाच्या राजकीय, सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल घडवून  आधुनिक भारताच्या या जडणघडणीत महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे मोलाचे योगदान असल्याचे प्रतिपादन आ.आशुतोष काळे यांनी  शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करताना  केले.
 दीन-दलित, उपेक्षित, शोषित समाजाच्या उद्धारासाठी व देशाच्या जडणघडणीत त्यांचा मोलाचा वाटा असणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे खऱ्या अर्थाने आधुनिक भारताचे जनक आहेत. त्यांनी देशावर केलेले अनंत उपकार बघता आपण कितीही वेळा त्यांच्यासमोर नतमस्तक होऊन प्रणाम केला तरी ते कमीच ठरणार आहे,असे गौरवोद्गार माजी आमदार भाजप प्रदेश सचिव सौ स्नेहलता कोल्हे यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतनिमित्त कोपरगाव शहरातील धारणगाव रोडवरील संजयनगर येथील भीम सरकार ग्रुप, राजगड, माधवबाग, एस. टी. बसस्थानक, संविधान चौक फाऊंडेशन, टिळकनगर, हनुमाननगर, टाकळी नाका मित्रमंडळ आदी ठिकाणी आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले
 भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी शेतक-यांच्या उन्नतीसाठी ब्रिटीशांबरोबर संघर्ष केला. त्यांचे शेतीविषयक विचार आजही जसेच्या तसे लागू होतात,. राजकीय शक्तीच सामाजिक उन्नतीची गुरुकिल्ली असुन जनतेत तेज आणि जागृती निर्माण होण्यासाठी बाबासाहेबांच्या विचारांचा ठेवा मोठा आहे. असे विचार संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी सहकार महर्षी शंकरराव कोल्हे कारखाना स्थळावर अभिवादन करताना  मांडले 
तरुण पिढीने उच्च शिक्षण घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी विचार आत्मसात करणे आवश्यक असूनआजची युवा पिढी जर  त्यांच्या विचाराचे वारसदार  झाली तरच पुढील पिढी सक्षम होईल व भारत महासत्ता झाल्याशिवाय राहणार नाही असे विचार जर कुंभारी धारणगाव, कोळगाव थडी , येथे अभिवादन करताना विवेक कोल्हे यांनी व्यक्त केले रात्री शहरातून निघालेल्या मिरवणुकीत विवेक कोल्हे यांनी  डीजेच्या तालावर ठेका धरत नृत्य केले यावेळी तरुणांमध्ये मोठा उत्साह संचारला होता.
कोपरगाव शहरातील धारणगाव रोडवरील संजयनगर येथील भीम सरकार ग्रुपच्या वतीने भीम सरकार चौकाचे नामकरण व वार्ताफलकाचे अनावरण तसेच बौध्द विहार येथे गरीब गरजू होतकरू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले . 
कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथे ग्रामपंचायत कार्यालय व डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक या ठिकाणी गावातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी एकत्र येत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना 132 व्या जयंतीनिमित्त अभिवादन केले.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त शहरासह तालुक्यात भीमसैनिक शिवसैनिक भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना रिपाई आठवले गट विविध संघटना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे  अनुयायी व विविध पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी नेते यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले

Leave a Reply

You cannot copy content of this page