गौतम पब्लिक स्कूलचा विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर भर – आ. आशुतोष काळे

गौतम पब्लिक स्कूलचा विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर भर – आ. आशुतोष काळे

Gautam Public School’s emphasis on quality of students – Aa. Ashutosh Kale

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Sat15 April23 ,14.20 PmBy राजेंद्र सालकर

कोपरगाव : शेतकऱ्यांच्या मुलांना इंग्रजी माध्यमाचे शिक्षण मिळावे या उद्देशातून स्थापन करण्यात आलेल्या गौतम पब्लिक स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर भर दिला जात असल्याचे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ वी जयंती दिनी  प्रवेशार्थी विद्यार्थी व पालकांशी संवाद साधला

 गौतम पब्लिक स्कूल येथे शुक्रवारी  आ. आशुतोष काळे यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. 

 आ. आशुतोष काळे म्हणाले की, गौतम पब्लिक स्कूल अल्प फी घेवून शिक्षण देणारी संस्था आहे. त्यामुळे भरमसाठ फी भरून देखील जी गुणवत्ता विद्यार्थ्याला मिळत नाही ती गुणवत्ता गौतम पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्याला मिळत असल्यामुळे दरवर्षी प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी मोठ्या संख्येने येत असतात. परंतु प्रवेश मर्यादित असल्यामुळे क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना प्रवेश देवून गुणवत्तेशी कधी तडजोड केली जात नाही. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचे ५ वी ते १० च्या वर्गात प्रवेश होवू शकले नाही त्या विद्यार्थ्यांनी व पालकांनी नाराज होवू नये. पुढील वर्षी लवकरात लवकर शाळेशी संपर्क  करून प्रवेश घ्यावा असे आवाहन केले.

यावेळी पालकांनी गौतम पब्लिक स्कूलविषयी आपल्या प्रतिक्रया व्यक्त करतांना सांगितले की, गौतम पब्लिक स्कूल ने आजपर्यंत कधीही जाहिरातबाजीवर भर न देता विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर भर दिला आहे त्यामुळे जाहिरात न करता देखील गौतम पब्लिक स्कूल मध्ये मिळणाऱ्या दर्जेदार शिक्षणाची महती सर्वत्र पसरली असल्यामुळे प्रत्येक विद्यार्थी व त्याच्या पालकांना गौतम पब्लिक स्कूलमध्ये शिक्षणासाठी प्रवेश घेण्याची इच्छा असल्याचे सांगितले.

यावेळी शाळेचे प्राचार्य नूर शेख यांनी शाळेच्या प्रवेशा विषयी माहिती देतांना सांगितले की, २०२३-२४ मध्ये गौतम पब्लिक स्कूल मध्ये घेण्यात आलेल्या प्रवेश परीक्षेला महाराष्ट्रभरातून विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. या प्रवेश परीक्षेतून ५ वी ते १० वीचे सर्व प्रवेश पूर्ण झाले असून १ ली ते ४ थीच्या प्रवेशासाठी लवकरात लवकर संपर्क साधावा असे आवाहन केले. यावेळी गौतम बँकेचे संचालक सुधाकर दंडवते, कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीचे माजी विश्वस्त वसंतराव दंडवते, प्राचार्य नुर शेख आदी मान्यवरांसह  सर्व शिक्षक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

        

Leave a Reply

You cannot copy content of this page