होमिओपॅथीतील नवीन संशोधन दूरगामी परिणाम करणारा खात्रीशीर उपचार -डॉ. गजानन धानिपकर
New research in Homeopathy is sure cure with far-reaching effect -Dr. Gajanan Dhanipkar
द मास्टर ऑफ होमिओपॅथी डॉ. गजानन धानिपकर (मुंबई) यांना तर एक्सलन्स अवॉर्ड’ डॉ. शार्दुल जोशी (पुणे) यांनाThe Master of Homeopathy Dr. Excellence Award to Gajanan Dhanipkar (Mumbai) Dr. To Shardul Joshi (Pune).
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Sat15 April23 ,14.30 Pm By राजेंद्र सालकर
कोपरगाव : होमिओपथितील नवीन संशोधनानुसार थायरॉइईड, पी.सी.ओ.डी व हार्मोन्सच्या सर्व तक्रारीवर विशेष परिणामकारक व दुरगामी परिणाम करणारे खात्रीशीर उपचार असल्याचे प्रतिपादन मुंबई येथील प्रख्यात होमिओपॅथिक तज्ञ डॉ. गजानन धानिपकर यांनी सोमवारी १० एप्रिल जागतिक होमिओपॅथी दिनी एसजेएस महाविद्यालयात आयोजित चर्चासत्रात केले.
फोरम कडुन यावर्षी ‘द मास्टर ऑफ होमिओपॅथी हा पुरस्कार डॉ. गजानन धानिपकर यांना तर एक्सलन्स अवॉर्ड’ पुरस्कार डॉ. शार्दुल जोशी (पुणे) यांना देण्यात आला.
१० एप्रिल हा होमिओपॅथी उपचार पद्धतीचा शोध लावणा-या होमिओपॅथीचे जनक डॉ क्रिस्टीएन फ्रेडरिक सॅम्युअल हॅनिमेन यांच्या २६८ व्या जयंतीनिमित्ताने व्हायटल होमिओपॅथिक फोरम व अटलबिहारी वाजपेयी कि मेडिकल कॉलेज, देवगड फाटा यांनी आयोजित केलेल्या चर्चासत्रात डॉ धानिपकर बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव प्रशांत देसरडा होते.
यावेळी डॉ. गोपाळघरे यांनी चर्चासत्रात सर्व प्रकारच्या त्वचाविकारांवर होमिओपॅथिक उपचार अत्यंत परिणामकारक असून सॉरीअँसीस व होमिओपॅथीयावर आपण विशेष संशोधन केल्याचे सांगून उपचाराआगोदर व नंतरचे बदल व फोटो व मार्फत दाखविण्यात आले.
व्हायटल होमिओपॅथिक फोरमचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र श्रीमाळी म्हणाले, होमिओपॅथीची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली असून अल्पावधीतच उपचार पद्धतीत होमिओपॅथी मोठी क्रांती करेल व मुख्य प्रवाहात अव्वल ठिकाणी राहिल असा विश्वास व्यक्त केला. यावेळी त्यांनी पुढील वर्षापासून होमिओपथी पदवी परिक्षेत प्रथम येणाच्या मुलामुलींना फोरम कडून विशेष पुरस्काराने गौरविण्यात येईल अशी घोषणा केली.
संस्थेचे चेअरमन प्रशांत देसरडा यांनीफोरमच्या संशोधन कार्यात व इजर्नलसाठी कॉलेज प्रयत्नशील असून फोरमचे सहकार्य लाभल्यास होमिओपॅथिक मध्ये मोठे संशोधन होऊ शकते अशी आशा आपल्या अध्यक्षीय भाषणात व्यक्त केली .
चर्चासत्रासाठी डॉ गजानन धानिपकर , डॉ राजेंद्र श्रीमाळी ,प्रिंसिपॉल डॉ प्रशांत गंगवाल ,उपाध्यक्ष डॉ प्रवीण बिडकर ,सचिव डॉ सोमीनाथ गोपाळघरे ,डॉ संजीव डोळे ,डॉ दुग्गड ,डॉ शार्दूल जोशी ,डॉ सचिन मुसमाडे डॉ. उमेश कोठारी आदी मान्यवरांसह या ४५० हुन अधिक होमिओपॅथिक तज्ञ व विद्यार्थी सहभागी झाले होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. प्रविण बिडकर यांनी केले.
यात अटलबिहारी कॉलेज, देवगड, एस पी कॉलेज श्रीरामपुर, आर जे एस कॉलेज कोपरगाव, डिएसएस कॉलेज औरंगाबाद यांचे विशेष सहकार्य लाभल्याचे फोरमचे सचिव व प्रिन्सीपल डॉ. प्रशांत गंगवाल यांनी सांगितले.
सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. सचिन मुसमाडे व रितीक सराफ यांनी मानले.
Post Views:
119