संजीवनी एमबीएमध्ये  विद्यार्थ्यांना आर्थिक नियोजनाचे धडे देण्यासाठी आर्थिक व्यवस्थापन केंद्र

संजीवनी एमबीएमध्ये  विद्यार्थ्यांना आर्थिक नियोजनाचे धडे देण्यासाठी आर्थिक व्यवस्थापन केंद्र

Financial Management Center to provide financial planning lessons to students in Sanjeevani MBA

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Mon17 April23 ,17.30 Pm By राजेंद्र सालकर

कोपरगांव: विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असतानाच आर्थिक नियोजनाचे धडे मिळावे यासाठी संजीवनी एमबीए विभागात संजीवनी ग्रुप  ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे यांचे संकल्पनेतुन ‘सेंटर ऑफ  एक्सलन्स इन फायनांसियल मॅनेजमेंट’ ची स्थापना करण्यात आली आहे.

यावेळी  संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  अध्यक्ष  नितिन कोल्हे यांचे प्रमुख उपस्थितीत संचय कॅपिटल-मोतीलाल ओसवाल कंपनीचे डायरेक्टर  सचिन कोते, मार्केटींग हेड अजिंक्य जाधव, संजीवनी इंजिनिअरींग काॅलेजचे डायरेक्टर डाॅ. ए. जी. ठाकुर, विभाग प्रमुख डाॅ. विनोद मालकर,  सेंटरच्या समन्वयिका प्रा. पुजा कावळे, आदी उपस्थित होते.
संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स  संचलित इंजिनिअरींग, एमबीए, फार्मसी, पाॅलीटेक्निक, सिनिअर काॅलेज या संस्थांनी आपल्या विध्यार्थ्यांना मोठ्या  प्रमाणात नामांकित कंपन्यांमध्ये नोकऱ्या  मिळवुन दिल्या आहेत. या संस्थांना ४० वर्षांची  मोठी परंपरा असुन अनेक माजी विध्यार्थी देश  परदेशात मोठ्या  पदांवर कार्यरत आहेत तर काही उद्योजक बनले आहे. सर्व माजी विध्यार्थी मोठ्या  प्रमाणावर अर्थार्जन करून योग्य आर्थिक नियोजन करून यशस्वी जीवन जगत आहेत. 
 संजीवनी एमबीए मध्येच विध्यार्थ्यांना  तज्ञांच्या मार्फत नियोजनाचे धडे मिळणार आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page