जेऊर कुंभारीत पोलिसांनी हस्तक्षेप करत बालविवाह रोखला

जेऊर कुंभारीत पोलिसांनी हस्तक्षेप करत बालविवाह रोखला

वृत्तवेध ऑनलाईन | 29 July 2020, 20:25
By : Rajendra Salkar

कोपरगाव : मुलीचे वय १८ वर्षांपेक्षा कमी व मुलाचे वय २१ पेक्षा कमी असतानाही ठरत असलेल्या विवाहाला थांबवत कोपरगाव पोलिसांनी हस्तक्षेप करत रविवारी बालविवाह रोखण्यात यश मिळवले आहे. बालविवाह ठरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी धाव घेत ठरत असलेला हा बालविवाह थांबवला आहे. शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जेऊर कुंभारी भागात एका अल्पवयीन मुलीचा विवाह होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

रविवारी (२६जुलै) सकाळी ११ वाजेच्या सुमारास स.फौ.शैलेंद्र गंगाधर ससाणे पोकॉ संदिप शांताराम काळे, क्लार्क आनंद बारसे पोलीस पाटील बाबासाहेब मगनराव गायकवाड यांनी तातडीने या भागात धाव घेत संबंधितांची चौकशी केली. सतिष इस्ते यांचे घराजवळ असलेल्या महादेव मंदीरा समोर १५ फुट रुंदीचा व ३० फुट लांबीचा मंडप टाकलेला होता व त्यात काही महीला नविन साडया व दागीने घालुन बसलेल्या दिसल्यास सदर मंडपामध्ये सतिष इस्ते व त्याची पत्नी विमल असे होते आम्ही त्यांचेकडे चौकशी करता त्यांनी सांगीतले की, आम्ही आमची मुलगी कोमल हीचे प्रशांत जगन्नाथ आव्हाड रा.घुलेवाडी ता.संगमनेर याचेशी आज रोजी लग्न ठरलेले असुन त्याकरीता मुलगा प्रशांत आव्हाड याचे वडील जगन्नाथ रखमाजी आव्हाड व मुलाची आई कविता जगन्नाथ आव्हाड हे तयार असुन आज रोजी आम्ही लग्न करुन देणार आहोत असे सांगीतले.

कोमल सतिष इस्ते वय १६ वर्षे ७ महीने २६ दिवस असल्याने ती अल्पवयीन आहे ती तसेच नवरदेव प्रशांत जगन्नाथ आव्हाड त्याचे वय १८ वर्षे ११ महीने असल्याने त्यास २१ वर्षे पुर्ण नसतानाही मुलीचे व मुलाचे आई वडील लग्न करण्यास तयार झाले होते सदरची बाब ही बाल विवाह प्रतिबंधक कायदयाचा भंग करणारी असल्याने मुलीचे आई-वडील सतिष रंगनाथ इस्ते विमल सतिष इस्ते दो.रा.जेऊर कुंभारी ता.कोपरगांव व नवरदेव प्रशांत जगन्नाथ आव्हाड त्याचे वडील जगनाथ रखमाजी आव्हाड आई कविता जगन्नाथ आव्हाड सर्व रा.घुलेवाडी ता.संगमनेर अशांना पो.स्टे.ला आणले आहे व माझी त्यांचे विरुध्द पोलीस पाटील बाबासाहेब मगनराव गायकवाड यांनी फिर्याद दिली आहे. सदर फिर्यादीवरून पाच जणांनी संगनमत करुन सदर लग्नाकरीता मंडप टाकुन विवाहाची संपुर्ण तयारी करुन लग्न करुन देणार होते.गुन्हा रजि.दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली स.फौ.एस.जी.ससाणे हे पुढील तपास करीत आहेत.

Leave a Reply

You cannot copy content of this page